23 November 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | रक्तदाब कमी झाल्यास काय कराल । अधिक माहितीसाठी वाचा

Alert from low blood pressure

मुंबई ५ एप्रिल : केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. लो बीपीदेखील आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे धावपळीच्या आणि तणावग्रस्त होत चाललेल्या आजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हांला लो बीपीचा त्रास असल्यास त्याकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे.

पाठीवर झोपा :

अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.

ORS घ्या :

ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी तयार ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.

पाणी प्या :

तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.

मीठ चाखा :

रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

 

News English Summary: High blood pressure alone is not dangerous. Low BP is also dangerous to health. So in today’s fast-paced and stressful lifestyle, if you suffer from low BP, you need to pay more attention to it.

News English Title: Remedy for low blood pressure health article new update

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x