Health First | उन्हाळ्यात त्वचा ठेवा अधिक मुलायम आणि तजेलदार । अधिक माहितीसाठी वाचा
मुंबई ५ एप्रिल : आपल्या त्वचेच्या गरजा ऋतुनुसार बदलत राहतात. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते तर उन्हाळ्यामध्ये त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. त्वचेचे नुकसान होऊ नये, यासाठी वेळोवेळी देखभाल करणं अतिशय आवश्यक आहे. ऋतुनुसार आपल्या सवयीत बदल घडवल्यास त्वचेला त्रास होणार नाही. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो, तेव्हा चेहरा मऊ आणि नितळ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात. ज्या प्रमाणे उन्हाळ्यामध्ये १० ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, त्याच प्रमाणे त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. कडक ऊन, गरम हवा आणि धूळ-मातीमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर गंभीर दुष्परिणाम होतात. अशावेळी त्वचेला काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते. उन्हाळ्यात त्वचा डिहायड्रेट होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
कमीत कमी मेकअप
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअपचा वापर कमी करावा. उन्हाळ्यात घाम आणि धुळीमुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो. मेकअप केल्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते.
पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा
उन्हाळ्यात पाणी तुमचं सर्वस्व असलं पाहिजे. आरोग्यदायी चेहरा आणि तब्बेतीसाठी शरिराला पुरेसे पाणी देणं गरजेचं आहे. दररोज आपण तीन ते चार लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक अर्धा तासाला पाणी पिणे गरजेचे आहे.
सनग्लासेसचा वापर करा
सनग्लासेसचा वापर केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. ग्लासचा वापर केल्यास अति उन्हामुळे डोळ्यांच्या नाजुक त्वचा खराब होण्यापासून बचाव होतो. तसेच डार्क सर्कल येत नाहीत.
घरगुती उपचारांची घ्या मदत
घरात असतान तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचे घरगुती उपचारांची मदत घेऊ शकता. पण कोणताही फेसपॅक किंवा अन्य कोणतेही घटक थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर प्रयोग करून पाहा. त्यापासून अॅलर्जी झाल्यास तो उपाय करू नये. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. त्वचेवर चमक यावी यासाठी मध, दूध, ओट्स, बेसन आणि यांसारख्या कित्येक गोष्टी तुम्हाला सहज घरात आढळतील. ज्यापासून तुम्ही फेस पॅक तयार करू शकता.
सनस्क्रीन
उन्हात जाण्याआधी चांगल्या गुणवत्तेचा सनस्क्रीन लावणे फायद्याचे ठरते. नेहमी उन्हात जात असाल तर सनस्क्रीन विसरू नका. जर तुमचा चेहरा ऑईली असेल तर चुकूनही ऑईल बेस सनस्क्रीन वापरू नका.
News English Summary: Your skin needs change with the seasons. Your skin becomes dry in winter and dehydrated in summer. It is very important to take care from time to time so that the skin is not damaged. If you change your habits according to the seasons, the skin will not be affected. When the natural moisture in the skin starts to decrease, there are a lot of problems to keep the face soft and smooth. Just as it is important to drink 10 to 12 glasses of water in summer, it is also important to take care of your skin. Hard wool, hot air and dust can cause serious side effects on facial skin. In this case, the skin needs care and nutrition. Learn how to take care not to dehydrate your skin in summer.
News English Title: Keep your skin clean and natural in summer health news update
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार