22 November 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी जाहीर होणार - मराठा क्रांती मोर्चा

Maratha Kranti Morcha, advocate Jayashree Patil, Maratha community, Anil Deshmukh

मुंबई, ६ एप्रिल: मुंबईतील बार, हुक्का पार्लर चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांप्रकरणी अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गृहमंत्र्यांवरील आरोपांची चाैकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने दिल्ली गाठली. याठिकाणी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख हे सिंघवी यांच्या घरी गेले होते. याठिकाणी अनिल देशमुख, अभिषेक मनु सिंघवी आणि वकिलांच्या एका टीममध्ये साधारण तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे अनिल देशमुख सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने CBI तपासाचा आदेश दिला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून संताप व्यक्त केला जात आहे. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारी करुन दिला आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागताच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केल्याने आधीच वाद आहे त्यात आणखी भर पडली आहे.

 

News English Summary: Adv. against former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh. While hearing the petition filed by Jayashree Patil, the Mumbai High Court ordered a CBI inquiry. After that, anger is being expressed by the Maratha Revolutionary Front. The Maratha Kranti Morcha has accused Jayashree Patil of defaming the Maratha community.

News English Title: Maratha Kranti Morcha has accused advocate Jayashree Patil of defaming the Maratha community news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x