22 November 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS
x

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता प्रोमोट करा - राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray, SSC, HSC examination

मुंबई, ६ एप्रिल: महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.

रात्रीला संचारबंदी आणि संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. राज्यात लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असूनदेखील कोरोना प्रकरणामध्ये घट येत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला अधिक कठोर पाऊल उचलण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या विषयाला हात घातला. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा.. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत.. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत. खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला असं राज ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: Raj Thackeray held a press conference today after an online meeting with Chief Minister Uddhav Thackeray. This time he touched on the subject of school children. Promote 10th-12th class students, pass without taking exams .. They don’t know in what mentality .. These kids are young, they don’t know where to study, how to take exams, they don’t know. Promoted lower students, pushed 10th and 12th class students.

News English Title: MNS chief Raj Thackeray talked on SSC and HSC examination news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x