Health First | गरम पाणी पिणे आहे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा
मुंबई ६ एप्रिल :पाणी म्हणजे जीवन. मनुष्य पाणी न पिता राहू शकणार नाही. पाणी सेवनाचे अनेक फायदे शरीराला मिळत असतात त्यातील मुख्य म्हणजे आपले शरीर ओलसर राहते आणि त्वचा नरम राहते. तहान लागली कि आपण पाणी पितो तसेच खाल्ल्यानंतरहि पाणी आवश्यक असते.
हेच पाणी गरम करून प्यायले गेले तर त्याचे जादुई परिणाम शरीरावर होतात. रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी पिण्याने पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते. पोटातील जळजळ कमी होते. तरुण वयात चेहऱ्यावर मुरमे पुटकुळया येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यावर क्रीम. लोशन असे अनेक उपाय केले जातात पण हवा तसा उपयोग होत नाही. या वयात सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यायले तर काही दिवसात मुरमे कमी झाल्याचे आणि त्वचेचा पोत सुधारल्याचे दिसते.गरम पाणी पिण्याचे आणखी काही फायदे खालीलप्रमाणे :
सर्दी – खोकला
गरम पाण्याची वाफ घेणं सर्दीवर चांगला उपाय आहे. यामुळे सायनस डोकेदुखीपासूनही आराम मिळू शकतो. सतत सर्दी-खोकला असल्यास गरम पाणी पिणं यावर रामबाण उपाय आहे. गरम पाण्याच्या गुळण्या केल्यानेही खोकला, घसादुखीपासून आराम मिळू शकतो.
पचनशक्ती –
गरम पाणी पचनतंत्र सक्रिय ठेवण्यास मदत करतं. गरम पाणी पोट आणि आतड्यांमधून जातं, त्यावेळी पचनतंत्र हायड्रेटेड होतात आणि जमा झालेला कचरा बाहेर काढण्यास मदत होते. जेवणानंतर काही वेळाने गरम पाणी पिण्याची सवय लावल्यासही फायदा होतो. यामुळे जेवण लवकर पचतं आणि पोट हलकं राहण्यासही मदत होते. नकळतपणे काही चुकीचं खाल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी गरम पाणी पचनतंत्राची मदत करु शकतं.
केंद्रीय मज्जासंस्था –
कोमट पाणी पिण्याने केंद्रीय मज्जासंस्था शांत राहते. यामुळे स्ट्रेस लेवलही कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना संधीवाताचा त्रास आहे त्यांनी केंद्रीय मज्जासंस्था शांत ठेवण्यासाठी गरम पाणी पिण्याने अतिरिक्त फायदा होऊ शकतो.
बद्धकोष्ठता –
कोमट पाणी पिण्यामुळे आतडे संकुचित होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमधे अडकलेला जुना कचरा आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. रोज कोमट पाणी पिण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.
हायड्रेटेड –
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी गरम पाणी अतिशय लाभदायक आहे. अनेकदा डॉक्टारांकडून एक व्यक्तीला कमीत-कमी आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. अनेकदा आपल्याकडून इतकं पाणी प्यायलं जात नाही. त्यामुळे संपूर्ण वेळ कोमट पाणी पित नसल्यास, दिवसाच्या सुरुवातीला एक ग्लास गरम पाणी आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी पिण्याने काही प्रमाणात हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत –
वजन सतत वाढत असल्यास गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून तीन महिन्यांपर्यंत पिण्याने फायदा होऊ शकतो. जर हे पाणी प्यायचे नसल्यास, जेवणानंतर एक ग्लास गरम पाणी पिणं फायद्याचं ठरेल.
News English Summary: Water is life. Man cannot live without drinking water. There are many benefits of drinking water, the main one being that your body stays moist and the skin stays soft. When you feel thirsty, you drink water and you need water even after eating.
News English Title: Drinking hot water is beneficiary to our health news health update
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार