वांद्रे पूर्व विधानसभा | जनसंपर्क तुटलेल्या तृप्ती सावंत भाजपच्या संपर्कात | आज प्रवेश झाला
मुंबई, ६ एप्रिल: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील माजी शिवसैनिक तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात तृप्ती सावंत मागील काही महिन्यांपासून जनसंपर्काची बाहेर होत्या तसेच त्यांच्याभोवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं वलय उरलं नसल्याने राजकीय प्रवास खडतर झाला होता. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या मतदार संघातील राजकीय स्थिती पाहता त्यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता असं म्हटलं जातंय.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी यांनी महापौर महाडेश्वर यांचा पराभव केला होता. बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांच्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाले. झिशान यांचे पिता बाबा सिद्दिकी या मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा निवडून आले होते. तृप्ती सावंत यांचे पती दिवंगत बाळा सावंत याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मागील वेळी निवडून आलेल्या तृप्ती सावंत यांना पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे त्यांना एक सुप्त सहानुभूती देखील मिळाल्याने त्यांना फायदा झाला होता. पण तो शिवसेनेचा उमेदवार पाडण्यापुरता मर्यादित होता.
काँग्रेसचे विजयी उमेदवार झिशान सिद्दीकी यांना ३७ हजार ६३६ मतं मिळाली होती. तर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना २३ हजार ०६९ मतं मिळाली होती. झिशान सिद्दीकी यांनी १४ हजार ५६७ मतांनी महाडेश्वरांचा पराभव केला होता. तसंच शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना सहानुभूती मिळाल्याने २३ हजार ८५६ मतं मिळाली होती. त्यामुळे शिवसेनच्या पराभवाचे प्रमुख कारण तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारली असल्याचे बोलले गेले होते. तर, मनसेच्या अखिल चित्रे यांना १० हजार ४०३ मतं मिळाली होती.
News English Summary: Shiv Sainik Trupti Sawant from Bandra East Assembly constituency has joined BJP. In the constituency where Chief Minister Uddhav Thackeray resides in Bandra East, Trupti Sawant has been out of public relations for the last few months and the political journey has been tough as there is no circle of office bearers and activists around him. But he has now joined the BJP.
News English Title: Shiv Sainik Trupti Sawant from Bandra East Assembly constituency has joined BJP news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार