22 November 2024 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

८ रुग्णांना एकाच चितेवर अग्नी | परिस्थिती बिकट | विरोधकांकडून लॉकडाऊन शिथिल करण्यावरून राजकारण

Maharashtra, Corona pandemic, Fadnavis

बीड, ७ एप्रिल: सध्या राज्यात ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याला कारण ठरलं आहे ते लोकं न समजून घेणारे गांभीर्य असं सांगितलं गेलं. मृतांचा आकडा वाढत असताना विरोध मात्र याचं भावनिक राजकारण करून राज्य सरकारला लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी दबाव वाढवत आहेत. एका बाजूला राज्य सरकारच्या निर्णयाला समर्थन देऊ असं म्हणणारे भाजप आणि मनसेचे पदाधिकारी आता निर्णय झाल्यानंतर पलटल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला आहे.

दुसरीकडे काल बीड येथे एक दुर्दैवी घटना घडली. मंगळवारी ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या आठही रुग्णांवर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या आठही रुग्णांना एकाच चितेवर ठेवून चितेला अग्नी देण्यात आला. बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे सरकत आहे. २४ तासांत स्वाराती रुग्णालयातील सात पुरुष व तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील एक महिला अशा आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगरपालिकेने शहराजवळील मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर आठही जणांना अग्निडाग दिला.

कोरोनाची साखळी मोडण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन या मोहीमेअंतर्गत अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. परंतू अनेक ठिकाणी विषाणूच्या जास्त प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर प्रशासकीय यंत्रणा स्वतःच अंत्यसंस्कार करत आहेत.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी येतात. या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाच्या विकाराचे आणि ६० ते ८० वयोगटातील असतात. असे रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात दोन्ही ठिकाणची मृत्युसंख्या वाढू लागली आहे.

मराठवाड्यात ५ एप्रिल रोजी पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर वर्षभरात मराठवाड्यात कोरोनामुळे तब्बल ५,८६९ जणांचे मृत्यू झाले. यात ५ एप्रिलपर्यंत सर्वाधिक मृत्यू एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १८१४ झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू हिंगोली जिल्ह्यात १०२ इतके झाले आहेत. विभागात आतापर्यंत २ लाख ९७ हजार ९२७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. २ लाख २५ हजार ८९० रुग्ण बरे झाले आहेत. तर, ४६ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 

News English Summary: An unfortunate incident took place at Beed yesterday. Eight patients died of corona on Tuesday. All the eight patients were cremated by Ambajogai Municipality. All eight patients were placed on the same leopard and the leopard was set on fire. At the Kovid Center of Swami Ramanand Tirtha Hospital in Ambajogai in Beed district, the number of coronary patients is increasing by more than 100 every day.

News English Title: Opposition parties politics in Maharashtra over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x