19 April 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

ही केंद्राच्या नियोजनशून्य कारभाराचे खापर बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायची सुरवात

Maharashtra, congress. Nana Patole, corona vaccination

मुंबई, ७ एप्रिल: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्यमंत्री राजेच टोपे म्हणाले, राज्यात रोज सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची तयारी आहे. मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. राज्यात फक्त १४ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त तीन दिवस पुरेल. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख लसींची गरज आहे. तेवढी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही आज चार ते साडेचार लाख रुग्णांना डोस देत आहोत. ही क्षमता सहा लाखांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रात लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी परत पाठवावे लागले. आमची आधीपासून मागणी आहे की, लसीचा पुरवठा ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने करा; पण अद्याप तो झालेला नाही. लसीकरणात सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही टोपे म्हणाले.

दुसरीकडे मागील काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरून केलेली वक्तव्य ऐकली. हा करोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठीचाच प्रयत्न आहे. या संदर्भात जबाबदारीने वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भिती निर्माण केली जात आहे. लसींच्या पुरवठ्याविषयी सर्व माहिती घेतली जात असून त्यासंदर्भात राज्य सरकारांना देखील माहिती दिली जात आहे. त्यामुळे लस तुटवड्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत”, असं हर्ष वर्धन यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची एकूण ५० पथके तयार केली असून यापैकी ३० पथके गुरुवारपासून महाराष्ट्रात येणार आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांना आता महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरवात केली आहे’, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलाय.

 

News English Summary: Maharashtra has the highest number of patients in the country. Meanwhile, there is another crisis in the state. There is a shortage of vaccines at various vaccination centers in the state. Health Minister Rajesh Tope has expressed fears that if the vaccines are not supplied to Maharashtra on time, the state will run out of vaccines in the next three days.

News English Title: Maharashtra congress president Nana Patole criticised Modi govt over politics on corona vaccination news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या