22 November 2024 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोदी सरकारने ६ कोटी लस जगभरात पुरवल्या | अन्यथा आज भारतात लसीकरण दुप्पट असतं - सविस्तर

Modi Govt, vaccination

मुंबई, ८ एप्रिल: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर बोलताना महाराष्ट्रावर सडकून टीका केलीय. महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केलाय. तसेच महाराष्ट्र सरकार राजकारण करत असून केंद्र सरकारवर विनाधार आरोप करत असल्याचाही दावा हर्षवर्धन यांनी केला. महाराष्ट्र सरकारने मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्रावर हल्ला चढवला होता त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हे आरोप केले आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारने कोरोना लसीकरण केंद्रं वाढवण्याची आणि 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण देण्याचीही मागणी केली होती.

आता मोदी सरकारने जगभरात आज पर्यंत ६ कोटी लसीचे डोस निर्यात केल्याची आकडेवारी समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. कारण आज पर्यंत भारतात ८ कोटी डोस लसीकरणातून सामान्य लोकांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याच आकड्याच्या जवळपास ८० टक्के म्हणजे ६ कोटी डोस मोदी सरकारने भारतीयांना प्राथमिकता न देताच जगभरातील देशांना निर्यात करण्याचा निर्णय अंगलट आल्याचं म्हटलं जातंय.

त्यामुळे उद्या भाजपशासित राज्यांनी हाच मुद्दा उचलून धरल्यास मोदी सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्यांनी पुरवठ्याबाबत मागणी करताच आणि तुटवडा जाहीरपणे व्यक्त करताच केंद्रातून राजकारण सुरु झालं आहे असं राजकीय आणि आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत.

 

News English Summary: The Modi government has so far exported 6 crore doses of vaccine worldwide, which has come as a shock to many. Because to date, 80 million doses of vaccine have been given to the general public in India. It is noteworthy that about 80 per cent of this figure, i.e. 60 million doses, is said to have been overturned by the Modi government without giving priority to Indians.

News English Title: The Modi government has so far exported 6 crore doses of vaccine worldwide news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x