18 April 2025 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्रात सर्वात कमी | जावडेकरांकडून चुकीची माहिती

Union Minister Prakash Jawadekar, Maharashtra, corona vaccine

मुंबई, ९ एप्रिल: सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता. तसेच राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडाही त्यांनी सांगितला होता. यासोबतच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच योग्य प्रकारे केले जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिले जातात. त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवे. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे.’

यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेश टोपे म्हणाले होते की, ‘लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.’

कोणत्या राज्यात किती टक्के वॅक्सिंन वाया गेले? (अधिकृत आकडेवारी)

तेलंगणा – १७.५%
आंध्र प्रदेश – ११.५%
उत्तर प्रदेश – ९.४%
कर्नाटक – ६.९%
जम्मू काश्मीर – ६.५%
राजस्थान – ५.६%
आसाम – ५.५%
गुजरात – ५.३%
पश्चिम बंगाल – ४.१%
महाराष्ट्र – ३.२%

वरील आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या लसीवरून ३.२% वेस्टेज इतर राज्यांच्या तुलनेने फार कमी आहे. दररोज ३४ लाख लोकांचे लसीकरण; मोहीम एका दृष्टिक्षेपात देशात दररोज सरासरी ३४ लाख ३० हजार ५०२ लसींचे डोस दिले जात आहेत. आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले की, आतापर्यंत सरासरी ९ कोटी ०१ लाख ९८ हजार ६७३ डोस देण्यात आले आहेत.

 

News English Summary: Health Minister Rajesh Tope informed that at present there is a huge shortage of vaccines in the state. After this, Union Health Minister Dr. Harshvardhan had leveled allegations against the state government. After that, Health Minister Rajesh Tope denied all the allegations and gave an explanation. Meanwhile, Union Information and Telecommunications Minister Prakash Javadekar had targeted the Maharashtra government.

News English Title: Union Minister Prakash Jawadekar gave wrong information over Maharashtra corona vaccine wastage news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या