24 November 2024 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of cumin seeds

मुंबई ९ एप्रिल : आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिर हे वापरले जातात. जिरे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत जिऱ्यामध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. तसेच त्वचेसाठी आणि वजन कमी करण्यासाठी जिरे फायदेशीर आहेत. जिऱ्यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टीऑक्सिडेंट गुण आढळतात. जे आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

जिऱ्यात बरेच एन्टीऑक्सिडेंट असल्याने सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. जीरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि सकाळी उठल्यावर या पाण्याने चेहरा धुतल्यास फायदा होऊ शकतो.

जिऱ्याच्या पाण्याने वाफही घेऊ शकता. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, इतर अशुद्ध घटकही बाहेर निघण्यास मदत होऊ शकते. यामुळे ब्लॅकहेड्स काढणंही सोपं होऊ शकतं. वाफ घेतल्याने त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळित होण्यास मदत होते.

जिऱ्यापासून बनलेला फेसपॅकही फायदेशीर ठरु शकतो. फेसपॅक बनवताना थोडी हळद आणि जीरं हे मिश्रण करुन त्यात मधाचे काही थेंब टाकावेत. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा, काही वेळाने सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होऊ शकते.

वजन कमी करण्याचा जिरेचे पाणी एक आरोग्यदायी मार्ग आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास मदत करते. एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि निरोगी आणि स्पष्ट त्वचा मिळविण्याचा एक चांगला मार्ग आहे. लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी आणि फ्लॅट पोट मिळविण्यासाठी आपण हे पेय सेवन केले पाहिजे.

News English Summary: Cumin is used in your kitchen. Cumin is very beneficial for your health Cumin contains iron, calcium, zinc, phosphorus and many other elements that can be useful in controlling uric acid. In addition, it contains many antioxidants that help relieve inflammation caused by uric acid. Cumin is also beneficial for skin and weight loss. Cumin has anti-inflammatory and antioxidant properties. Which are beneficial for glowing, glowing skin with health.

News English Title: Use cumin in our meals ,you know the effects news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x