22 November 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Health First | जाणून घ्या आवळ्याचे आरोग्यास होणारे उपयुक्त असे फायदे । नक्की वाचा

benefits of aamla

मुंबई ९ एप्रिल : “आवळा” एक महत्त्वाचे औषध म्हणून देखील ओळखले जाते. आवळा भारतीय आयुर्वेद आणि युनानी प्रणालीच्या प्रसिद्ध औषधांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राश, ब्राह्मी रसायन, धत्री रसयान, त्रिफळा चूर्ण आणि रसयाना, आमलाकी रसायन देखील आवळापासूनच तयार केला जाते. तसेच आवळ्यापासून तेलही बनवले जाते. आवळा (आमला) मानवी शरीरावर अमृत समान आहे. त्यात व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. ते कच्चे किंवा शिजवलेले किंवा कोणत्याही प्रकारे सुकविलेले खाणे शरीराला अगणित फायदे प्रदान करते.

उच्च रक्तदाब, मधुमेह –
आवळा, आवळ्याचा ज्यूस उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

मॉर्निंग सिकनेस –
गर्भवती असताना महिलांना सकाळी झोपून उठल्यावर अनेकदा त्रास होतो. मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करण्यासाठी आवळा उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यावर चक्कर किंवा उलटीसारखं होत असल्यास कच्चा किंवा सुकवलेल्या आवळ्याचा एक तुकडा खाल्याने फरक जाणवतो.

पचनशक्ती वाढते –
पचनासाठी आवळा नैसर्गिक उपाय आहे. नेहमीच अपचनाचा त्रास होत असल्यास २ ते ३ आवळ्याचे तुकडे खावेत. डायजेस्टिव गोळ्या किंवा अॅन्टाअॅसिड औषधांपेक्षा आवळा उत्तम उपाय आहे. आवळा पचनतंत्रामध्ये गॅस्ट्रिक लिक्विड उत्पन्न करण्यास मदत करतो. हे लिक्विड पचन प्रक्रिया वाढवण्यास मदत करतं. बद्धकोष्टता, गॅस, अॅसिडिटी, पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.

तोंडाला दुर्गंधी –
ज्या लोकांना सतत तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. सुख्या आवळ्याचे तुकडे जवळ ठेवा. ज्यावेळी दुर्गंधी जाणवेल त्यावेळी २ ते ३ आवळ्याचे तुकडे खा. अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्त्व असलेला आवळा दुर्गंधीचं कारण बनणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतो.

कॅन्सरपासून बचाव –
आवळ्यात अॅन्टी-ऑक्सिडेंट गुण असतात. सोबतच आवळ्यात अॅन्टी-कॅन्सर गुणही असतात. एका संशोधनानुसार, आवळा कॅन्सर पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करतो.

रक्त शुद्धी –
आवळा खाल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. आवळ्यात असलेल्या अॅन्टी-ऑक्सिडेंट आणि सी व्हिटॅमिनमुळे त्वचा तजेलदार, चमकदार होण्यास मदत होते.

केसासाठी उपयुक्त ठरते-
केसांची निगा राखण्यासाठी तयार केलेल्या उत्पादनांमध्ये बर्‍याच प्रमाणात आवळा (आमला) वापरला जातो. याचे कारण सोपे आहे, आवळा (आमला) अमीनो असिडस्, लोह आणि अन्टी ऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे, जे केसांना बळकट करण्यास, त्यांचे गळणे कमी करण्यास, केस पांढरे होणे आणि केसांच्या आरोग्यासंबंधीच्या इतर समस्यांना प्रतिबंधित करण्यात मदत करतात. आवळा नियमित सेवन केल्याने केसांची वाढ सुलभ होते आणि मजबूत व चमकदार होते.

डोळ्यांची दृष्टी सुधारते :
आवळा डोळ्यांसाठी खुप फायदेशीर आहे. हे डोळ्यांच्या दृष्टि सुधरवाण्यासाठी खुप उपयुक्त आहे. आवल्यामुळे मोतीबिंदू, रातांधळेपणा आणि डोळ्यांचे इतर आजार बरे होतात. आवळ्याच्या नियमीत सेवनाने दृष्टी सुधारते आणि संक्रमणाचा धोका कमी होतो.

सर्दी आणि फ्लूपासून मुक्तता होते :
प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा रस प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.

News English Summary: Aamla is also known as an important medicine. Aamla is used in famous medicines of Indian Ayurveda and Unani system. Chyavanprash, Brahmi Rasayan, Dhatri Rasayan, Triphala Churna and Rasayana, Aamlaki Rasayan are also made from Aamla. Oil is also made from amla. Amla is the same as nectar on the human body. It is rich in vitamin C. Eating it raw or cooked or dried in any way provides countless benefits to the body.

News English Title: Immunity booster Amla news update article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x