23 November 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर

Weekend lockdown, Maharashtra, guidelines

मुंबई, १० एप्रिल: राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून, शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यात लॉकडाऊन बाबत मत जाणून घेण्यात आले.

महाराष्ट्रात एका दिवसात 56,286 कोरोना रुग्ण आढळले आहेत तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 36130 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईमध्येही एका दिवसात 8,938 प्रकरणे समोर आली आणि 25 जणांचा मृत्यू झाला. राज्यात 5,21,317 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात 7 व्या क्रमांकावर आहे. आता यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिकेत समोर आली आहेत.

राज्यातील कोरोना रूग्ण संख्या वाढल्याने सरकारने काही निर्बंध लादले आहेत. महत्त्वाचं म्हणजे विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, नागरिकांच्या मनात संभ्रम आहे की नक्की काय सूरू राहणार आणि काय बंद राहणार? याचीच उत्तरे जाणून घ्या.

राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.

काय सूरू राहणार आणि काय बंद राहणार?

1.  ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील

2. ब्रेक द चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

3. कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे

४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?

बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील

५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?

वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?

नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

७. नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?

हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होम डिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?

नाही.

९. रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?

हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

नाही.

११. दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?

नाही.

१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ?

हो. आठवड्याच्या दिवशी (वीक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (वीकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.

 

News English Summary: The government has imposed some restrictions due to the increase in the number of corona patients in the state. Importantly, the weekend lockdown has been implemented. However, there is confusion in the minds of the citizens as to what exactly will continue and what will stop? Find out the answers.

News English Title: Weekend lockdown guidelines news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x