4 December 2024 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का?

PM Narendra Modi, nationwide lockdown

मुंबई, ११ एप्रिल: महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे. हा विरोध भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेमुळे असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. परंतु, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, ‘देशात लॉकडाऊनची गरज आहे की, नाही याविषयी निर्णय पंतप्रधान घेतील. मात्र काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. चर्चा करत त्यांचे मुद्दे लक्षात घेतले. लॉकडाऊनची गरज असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. जर केंद्राला वाटत असेल की, लॉकडाऊनची गरज आहे. तर पंतप्रधान मन की बात देशाला सांगतील. मात्र पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर याविषयी केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतात.’

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केला असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका ही वेगळी असू शकते. जर पंतप्रधान मोदींनी देशात पुन्हा लॉकडाऊन लागू केला, तर देवेंद्र फडणवीस म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन लागू करा. अशा परिस्थितीत राजकारण करणे कोणालाही शोभत नाही. लोकांचे जीव वाचवणे हे महत्त्वाचे आहे’ असे राऊत म्हणाले.

 

News English Summary: If the number of corona patients increases tomorrow and Prime Minister Narendra Modi announces a nationwide lockdown, then what will Devendra Fadnavis do? Sanjay Raut has asked such a sharp question.

News English Title: If PM Modi will again announces nationwide lockdown then Fadnavis will oppose says Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x