21 November 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ

Corona Second Wave, CM Yogi Adityanath

लखनऊ, ११ एप्रिल: भारताने व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत शनिवारी मोठा विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले. एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. मात्र एकूण व्हॅक्सीनेशनच्या हिशोबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.

शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले की, केंद्र आणि राज्यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भारतातील डेथ रेट जगातील सर्वात कमी (1.28%) आहे.

एकाबाजूला कोरोनाने संपूर्ण देशातच हाहाकार घातला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, की माणूस राहिला, तरच आस्था व्यक्त करू शकेल. मणूस आहे, म्हणून आस्था आहे. आस्थेमुळे माणूस नाही. रमजानसह इतर सनांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणणाले, माणूस वाचला तर आस्था टिकेल. त्यामुळे कुठलेही धर्मिक स्थळ असो, तेथे पाच हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. योगी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे. आम्हाला पहिल्या लाटेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही व्यापक रणनीती तयार केली आहे. सर्व कोरोना नियमांचे पालन करून सण आणि उत्सव साजरे करा.

 

News English Summary: Chief Minister Yogi Adityanath said, “We will discuss this with the religious leaders tomorrow or the day after tomorrow.” Human life will be given priority. Not only that, but the rules have to be followed to prevent corona. The second wave of corona virus is even more deadly than the first. We have experienced the first wave. So we have developed a comprehensive strategy. Celebrate festivals and celebrations by following all the Corona rules.

News English Title: The second wave of corona virus is even more deadly than the first said CM Yogi Adityanath news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x