29 April 2025 9:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
x

आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

lockdown, Rajesh Tope

जालना, ११ एप्रिल: राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे म्हणाले की, दोन तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे, असंही ते म्हणाले.

महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing rapidly. The Chief Minister had said in an all-party meeting yesterday that lockdown in the state is the only option to break the corona chain. Against this backdrop, Health Minister Rajesh Tope has given important information. The lockdown in the state will be for at least 15 days. The lockdown has prepared everyone’s mind. The final decision will be taken by the Chief Minister in two to three days, Tope said.

News English Title: State health minister Rajesh Tope gave important primary updates about lockdown decision news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या