22 November 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सातारा | बावधनच्या बगाड यात्रेनंतर पोलिस आणि भाविकांसह ६१ जणांना कोरोना

Satara, Bagad Yatra

सातारा, १२ एप्रिल: कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे मागील सोमवारपासून कडक निर्बंध लागू केल्यापासून पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

सरकारने गर्दी टाळा, सार्वजनिक कार्यक्रम, सभा आयोजित करू नका असं सांगूनही नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. साताऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण वाढत आहेत. दरम्यान, वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा गावकऱ्यांच्या अंगलट आली असून आतापर्यंत या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनानंतरही संसर्ग वाढत आहे. साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊन तसेच आठवडाभर मिनी लॉकडाऊन असूनही संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागापुढे संसर्ग कसा रोखायचा याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शुन्य मृत्यू दरावरून आता कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढून १४ वर गेले आहे. जिल्हा प्रशासनाचे जमावबंदी आदेश लागू असतानाही बंदी झुगारन वाई तालुक्यातील बावधन गावाने आपली बगाड यात्रा साजरी केली होती.

बावधन परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्याचाही समावेश आहे. वाई तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडाही वाढू लागला आहे. आता आरोग्य यंत्रणेने वाई तालुक्यात लक्ष केंद्रीत करून येथील साखळी तोडणे गरजेचे

 

News English Summary: It has come to light that the rules are not being followed even though the government has told them to avoid crowds, public events and meetings. Even in Satara, a large number of corona patients are growing. Meanwhile, the Bagad Yatra of Bawadhan in Wai taluka has come to the notice of the villagers and so far 61 people have tested positive for corona.

News English Title: Satara Bagad Yatra corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x