24 November 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Health First | नियमित व्यायाम करणाऱ्यांनी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश नक्की करावा

healthy exercise and healthy diet

मुंबई १२ एप्रिल : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात आणि चालतात. चालण्याने मधुमेह, हृदयरोग, बीपी यासारखे आजार देखील दूर होण्यास मदत होते. मुळात व्यायाम करणे हेच आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, व्यायाम करत असतानाच आपण आहारामध्ये काय घेतो हेही महत्वाचे आहे.

बदाम दूध किंवा ओट्स दूध:
व्यायाम करण्याआधी बदाम दूध किंवा ओट्स दूध पिणं आवश्यक ठरतं. हे शरीराला पुरेशी उर्जा पुरवण्याचं काम करतात. यामुळे व्यायाम करतानाही उर्जा मिळते. तसंच शरीराला पुरेसं पोषणही मिळण्यास मदत होते.

फळे:
जितकं शक्य आहे तितकं आहारात फळांचा समावेश करा. फळांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं. व्यायाम करण्याच्या जवळपास २ तासांपूर्वी आणि त्यानंतरही केळं खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. संत्री, द्राक्षही फायदेशीर ठरतात.

प्रोटीन:
शरीराच्या वजनानुसार, दररोज ०.९ ग्राम प्रोटीन आपल्या आहारात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही वजन नियंत्रणात राखू इच्छिता तर कॅलरीचं प्रमाण तपासणं महत्त्वाचं आहे.

कार्बोहायड्रेट :
कार्बोहायड्रेट प्रोटीनच्या तुलनेत शरीराला लवकर उर्जा प्रदान करतात. याची व्यायामावेळी अधिक आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट मांसपेशींमध्ये ग्लायकोजनची गरज भरुन काढण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आहारात फरसबी, ब्राउन राइस यासारख्या पदार्थांचं सेवन करणं महत्त्वाचं ठरतं. व्यायाम करण्याआधी ५० ग्राम कार्बोहायड्रेट घेण्याचा सल्ला दिला जातो.

News English Summary: Changing lifestyles have affected the weight of many. The nature of the work and the diet are important factors. Weight gain is a major problem for many. Many people exercise and walk to lose weight. Walking also helps to get rid of diseases like diabetes, heart disease, BP. Basically, exercising is good for your health. However, what you take in your diet while exercising is also important.

News English Title: Keep your diet fix whenever you exercising regularly news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x