22 April 2025 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

कोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत - हायकोर्ट

Gujarat high court

गांधीनगर, १२ एप्रिल: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.

रविवारी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली होती. या याचिकेवर आज (१२ एप्रिल) सुनावणी झाली.

यावेळी कोर्टाने विविध मुद्दे उपस्थित करत सरकारकडे उत्तरं मागितली. त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी काही मुद्दे उपस्थित करत सरकारला प्रश्न विचारले. “कोरोना चाचण्यांचा वेगाने करायला हव्यात. सर्वसामान्य माणसाला करोना चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी ४ ते ५ दिवस लागतात. तर अशाच परिस्थिती अधिकाऱ्यांना काही तासांत आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट मिळतो. तालुका आणि लहान गावांमध्ये कुठेही आरटी-पीसीआर चाचणी केंद्र नाहीत. गुजरातमध्ये जर २७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आलेली आहेत, तर मग प्रत्येक कोविड रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन का उपलब्ध नाहीये. किती इंजेक्शन वापराविना पडून आहेत, याचा शोध घ्या,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे गुजरातच्या इस्पितळांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या असून त्यांना जागाच उपलब्ध होतं नाही. यावरून न्यायालयाने ‘गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत’ अशी धक्कादायक टिपणी केल्याने गुजरात सरकारची चांगलीच पोलखोल झाल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: What is special is that there are queues of patients outside the hospitals in Gujarat and there is no space available for them. The court’s shocking remark that “the people of Gujarat feel that they are living by the grace of God” is said to have hurt the Gujarat government.

News English Title: Gujarat high court slams BJP govt over corona pandemic situation in Gujarat state news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या