Health First | अळूची पानांचे आहेत हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मुंबई १३ एप्रिल : अळूच्या वड्या सगळ्यांच्या आवजताचा पदार्थ आहे. अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात ही पाने सहज उपलब्ध असतात. या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात आळूच्या पानांचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे..
‘व्हिटॅमिन ए’चा मुबलक साठा:
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळते. सुमारे 100-200 ग्रॅम अळूमधून व्हिटॅमिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळूमध्ये 120 % ‘व्हिटॅमिन ए’ आढळते. यामुळे त्वचा सतेज होण्यास मदत होते.
‘व्हिटॅमिन सी’ चा पुरवठा होतो:
केवळ आंबट पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आढळते हा समज दूर करून अळूचा आस्वाद घ्या. कारण अळूच्या पानांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ चा सुमारे 80% साठा असतो. त्याचा फायदा जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
आयर्नची झीज भरून निघते:
रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.
कॅल्शियमचा पुरवठा करते:
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते.
दृष्टी सुधारते:
अळूच्या पानांच्या सेवनामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. तसेच डोळ्यातील शुष्कपणाच्या समस्येवर फायदेशीर ठरत मॉईश्चर सुधारते.
फ्री रॅडीकल्सचा धोका कमी होतो:
ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस, फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक घातक आजारांपासून बचाव होतो.
शरीरात वाढणारा अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.
News English Summary: Aloo vadya is everyone’s favorite food. Eating colocasia leaves is extremely beneficial for your health. These leaves are readily available in the market. These leaves are rich in A, B, C, Calcium, Potassium and Antioxidants, which are beneficial for your body. Therefore, the inclusion of colocasia leaves in the diet helps to get rid of many problems of the body. Come on in, take a look and enjoy yourself!
News English Title: Colocasia leaves are useful to our health new update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC