23 November 2024 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | भाजलेले चणे खा आणि जाणून घ्या त्याचे फायदे । नक्की वाचा

benefits of roasted chickpeas

मुंबई १३ एप्रिल : जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा. दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं.

ब्लड शुगर नियंत्रित राहते
चणे खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर नियत्रिंत राहण्यास मदत करतात. डॉक्टर्सही शुगर असलेल्या पेशेट्सना चणे खाण्याचा सल्ला देतात. याच्या दररोजच्या सेवनाने शुगरचा त्रास दूर होतो. भाजलेल्या चणे दररोजच्या डाएटमध्ये सामील केल्यास डायबिटीजपासून आराम मिळतो.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहेत चणे
प्रेग्नंट महिलांना चणे खाल्ल्याने खूप फायदे मिळतात. गर्भारपणात स्त्रियांना उलट्यांचा त्रास होतो. याचा परिणाम बाळावरही होतो. कारण उलट्यांमुळे शरीरावर जोर पडतो. यावेळी महिलांना भाजलेल्या चण्याचे सत्व फायदेशीर ठरते.

हाडे मजबूत होतात
चण्यामध्ये दूध आणि दह्यामध्ये जितके कॅल्शियम असते तितके आढळते. दररोज चणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

स्नॅक्स म्हणून खाण्यास उत्तम
संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही चणे खाल्ले पाहिजे. यामुळे डाएट कंप्लीट होते. हे खाण्यासही चांगलेलागतात. चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. तसेच यात कॅलरीज कमी असल्याने वजनही कंट्रोलमध्ये राहते

रोगप्रतिकारक क्षमता वाढेल
चणे खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होईल. यामुळे साहजिकच रोगप्रतिकारक क्षमताही वाढेल. चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स असल्याने आपली हेल्थ सिस्टीम मजबूत करकाक

वजन होते कमी
भाजलेल्या चण्यांचा दररोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

कबंरदुखीपासून सुटका
अशक्तपणामुळे अनेकदा महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. अशात महिलांनी दररोज दोन मूठ चणे खाल्ल्यास फायदा होतो. कंबरदुखीपासून सुटका मिळते.

News English Summary: If you only eat roasted chickpeas for taste, be sure to include them in your daily routine. Eating roasted chickpeas every day is very important for the body. Roasted chickpeas are nutritious. Roasted gram also works to relieve stomach ailments and constipation. There are two types of roasted chickpeas available in the market. Preferably eating roasted chickpeas with peel is very beneficial for health.
Roasted gram is rich in carbohydrates, protein, calcium, arsenic and vitamins.

News English Title: Eat roasted chickpeas then you notice its healthy effects news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x