23 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | औषधी गुणधर्म असणारा गूळ खा आणि नक्की त्याचे फायदे पहा

benefits of jaggery

मुंबई १३ एप्रिल : गूळ हा साखरेचा सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे . गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं. हिवाळ्यात गुळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.

– घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि आलं एकत्र गरम करुन खाल्ल्याने फरक पडू शकतो.

– थंडीच्या दिवसांत सांधेदुखीच्या त्रासाची शक्यता अधिक असते. अशा वेळी गुळ या दुखण्यातून काही प्रमाणात आराम देऊ शकतो. आलं आणि गुळ, किंवा हे मिश्रण एकत्र दुधासोबतही घेता येऊ शकतं. संधीवात असणाऱ्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत रोज गुळ खाणं फायदेशीर ठरु शकतं.

– जेवणानंतर एक छोटा तुकडा गुळ खाल्ल्याने पचनासंबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. गुळाच्या सेवनाने पोटात गॅस होण्याची समस्याही कमी होते.

– मासिक पाळीच्या वेळी महिलांना अनेकदा त्रास होतो. यावेळी होणारा त्रास आणि चिडचिडेपणा गुळ कमी करु शकतो. मासिक पाळीवेळी दिवसांतून ३ ते ४ वेळा गुळ खाऊ शकता.

– ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही गुळ खाणं फायद्याचं आहे. गुळात सोडियम आणि पोटॅशियम असतं. हे शरीरात अॅसिडचं प्रमाण कंट्रोल करण्यास मदत करतं. त्यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहू शकतं.

News English Summary: Jaggery is the healthiest and best alternative to sugar. Jaggery contains natural sweeteners which are not only delicious to eat but also beneficial for the body. Jaggery is widely used in winter. Jaggery contains Vitamin-A and Vitamin-B, Sucrose, Glucose, Iron, Calcium, Phosphorus, Potassium, Zinc, Magnesium. Especially jaggery is high in phosphorus. Jaggery contains many minerals and vitamins that the body needs. Which act as a natural cleanser for your skin. These ingredients keep the body clean inside and make the skin glow. Also jaggery helps in controlling body temperature. Drinking jaggery instead of sugar in lukewarm water or tea is very beneficial for health.

News English Title: Jaggery is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x