19 April 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

भाजपाची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नाही तर महाविकासआघाडी सरकार विरोधात - पडळकर

MLA Gopichand Padalkar

पंढरपूर, १४ एप्रिल: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचार शेवटच्या टप्यात आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार टीका होऊ लागली आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार आणि खालच्या भाषेत टीका केली. राज्यातील राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे असून बलात्कारी आहे, असा घणाघाती हल्लाच पडळकर आणि दरेकरांनी आज केला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमदेवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर आज पंढरपुरात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आवताडे यांचा प्रचार करताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाच मात्र, राष्ट्रवादीवरही घणाघाती टीका केली. पडळकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलं आहे. त्याच्याविरोधात आमची भूमिका आहे, असं पडळकारांनी सांगितलं. त्यानंतर पडळकर ठाकरे सरकारवर जोरदार तुटून पडले.

राज्यातील सरकार हे बलात्कारी सरकार आहे. गुन्हेगारांचं सरकार आहे. मागील दोन महिन्यात टीव्हीवर या सरकारच्या काळ्याधंद्यांच्या बातम्यांशिवाय एकही बातमी दिसत नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केली आहे.

 

News English Summary: The Pandharpur-Mangalwedha Assembly by-election campaign is in its final stages and has drawn strong criticism from both sides. Today, Praveen Darekar, Leader of Opposition in the Legislative Council, and Gopichand Padalkar, MLA of the Bharatiya Janata Party, criticized the Thackeray government in strong and derogatory language.

News English Title: MLA Gopichand Padalkar targets MahaVikas Aghadi at Pandharpur Mangalvedha bypoll news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या