22 November 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट | महाराष्ट्रात परतणाऱ्यांचा शोध सुरू

Kumbh Mela 2021

वर्धा, १६ एप्रिल: हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभू कुमार झा म्हणाले की, या संख्येनं हरिद्वार ते देवप्रयागपर्यंत संपूर्ण मेळाव्यात पाच दिवसांत विविध आखाड्यांच्या साधूंनी आणि संतांनी केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन या दोन्ही तपासणीचा डेटा समाविष्ट आहे. ते म्हणाले की, आरटी-पीसीआरच्या पुढील तपासणीचे निकाल अजून आलेले नाहीत आणि ही परिस्थिती पाहता कुंभमेळा क्षेत्रात संक्रमित व्यक्तींची संख्या 2000 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातून परतणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेण्याचे काम वर्धा जिल्हा मुख्यालयामार्फत सुरू झाले आहे. पोलिसांनीही कुंभमेळ्यात गेलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून केले आहे. वर्षभरापूर्वी तबलिगींच्या ‘मरकज’मधून परतलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाला बराच खटाटोप करावा लागला होता. आताही तसेच चित्र आहे.

हरिद्वार येथे संपन्न झालेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी झाली. वर्धा जिल्ह्यातूनही काही भाविक हरिद्वार येथे गेले आहेत. आता ही मंडळी मेळा आटोपून परतीच्या वाटेवर आहेत. त्यांची निश्चित संख्या पुढे आलेली नाही. जिल्ह्यात दरदिवशी करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या, सध्या अशा भाविकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही आणि त्याबाबत माहिती घेतली जात आहे.

 

News English Summary: The Wardha district headquarters has started searching for devotees returning from Kumbh Mela in the wake of the Corona infection. The police have also appealed through the control room to provide information about the persons who went to Kumbh Mela.

News English Title: Search of returnees from Kumbh Mela 2021 begins in Maharashtra state news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x