22 November 2024 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

कोरोना आपत्ती | देशात प्रतिदिन २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो - अहवाल

Corona second wave

नवी दिल्ली, १६ एप्रिल: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रावर लॉकडाऊनची वेळ ओढावली असली तरी देशातील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच देशात 1 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आता हा आकडा थेट 2,00,739 वर जाऊन पोहोचला आहे.

मागील 24 तासांमध्ये हे नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा वेग धडकी भरवणारा आहे. एका बाजूला कोरोनासंबंधित औषधांचा आणि लसीचा तुटवडा आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतासाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात जूनमध्ये दररोज २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं रौद्ररुप धारण केलं आहे. दररोज बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, आरोग्य यंत्रणांवर असह्य ताण पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे बेडपासून ते इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. देशातील अशी परिस्थिती असताना आता आणखी एक भयावह अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील, असं इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. ‘लॅन्सेट’मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

 

News English Summary: On the one hand, there is a shortage of corona-related drugs and vaccines, and on the other hand, there is another threat to India. The second wave of Covid could kill 2,320 people a day in the country in June, according to a report.

News English Title: The second wave of Covid could kill 2320 people a day in the country in June according to a report news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x