22 November 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप

Union minister Piyush Goyal

नवी दिल्ली, १७ एप्रिल: राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येते असून, रूग्ण मृत्यूमध्येही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आणि देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण वाढत आहे. तसेच, आरोग्य व्यवस्थेवरही ताण येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले असून त्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्याचीही भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. यावरुन आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून केंद्रावर टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. “ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेले प्रकार पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी असंही म्हटले आहे की, राज्याला (महाराष्ट्राला) सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. “आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले आहेत.

 

News English Summary: It was sad to see politics of CM Uddhav Thackeray running on oxygen supply. The central government is trying to produce more oxygen in the country. We are currently producing 110 per cent of our capacity and the oxygen of the industrial sector is also being made available for medical use, ”said Piyush Goyal.

News English Title: Union minister Piyush Goyal criticized State govt over oxygen supply issue news updates.

हॅशटॅग्स

#PiyushGoyal(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x