इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांची चौकशी करताच इतकी तडफड हा कुठला महाराष्ट्रधर्म?
मुंबई, १८ एप्रिल: मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.
सुमारे तासभर पोलिस ठाण्यात राहिल्यानंतर बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अचानक रात्री 9 वाजता Bruck Pharma च्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. ही एक अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. Bruck Pharma च्या अधिकाऱ्याला एका मंत्र्याच्या OSD ने दुपारी कॉल करुन धमकी दिली होती की, तुम्ही विरोधीपक्षाला रेमडेसिविर कसे पुरवू शकता? यानंतर रात्री 10 वाजता पोलिस त्यांना पकडून घेऊन आले’
दरम्यान देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून, अनेक ठिकाणी बेड शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा देखील मोठा तुटवडा पहायला मिळत आहे. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ट्वीट करत निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला Remdesivir इंजेक्शन पुरवल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. भाजपचं हे षड्यंत्र भेदून महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे. असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
News English Summary: The number of corona patients in the state is on the rise and there is a shortage of beds in many places. Meanwhile, the state is also facing a huge shortage of remedicivir injections. The state government is also seen struggling to get remedial injections at the time. NCP’s women state president Rupali Chakankar has also tweeted on all these issues.
News English Title: Devendra Fadnavis reached in Vile Parle police station to help Bruck Pharma owner news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News