22 April 2025 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

फडणवीस रेमडेसिवीर प्रमाणे लस जमा करुन अपात्र कुटुंबियांना देत आहेत | लोक मरत आहेत, तुमचं कुटुंब सुरक्षित - काँग्रेस

Devendra Fadnavis Nephew Tanmay Fadnavis

बंगळुरू, १९ एप्रिल: रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली. त्यामुळे आता भाजप पक्ष याविरोधात काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, कारण त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना नियम धुडकावून लस देत सुरक्षित केल्याचं आरोप काँग्रेसने केला आहे. सध्या देशात ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस देण्याचं अभियान सुरु आहे. मात्र महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतःच्या कुटुंबियांना नियमात बसत नसताना देखील कोरोना लस देत असल्याचा आरोप थेट त्यांचे फोटो शेअर करून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे कर्नाटकातील नेते श्रीवत्सा यांनी ट्विट करत मोठे प्रश्न उपस्थित करत फडणवीसांना लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना श्रीवत्सा यांनी म्हटलं आहे की, “प्रिय देवेंद्र फडणवीस, तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस 45+ वर्षे वयाचे आहेत का? जर नसेल तर तो लस घेण्यास कसा पात्र झाला? रीमॅडेसिव्हिर प्रमाणेच आपण लस जमा करुन आपल्या कुटुंबातील सदस्यांना देत आहात? लोक मरत आहेत. तेथे लसीची कमतरता आहे. परंतु फडणवीस कुटुंब सुरक्षित आहे.

दरम्यान, वृत्त पसरताच फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी इंस्टाग्रामवरील स्वतःची पोस्ट डिलीट मारली आहे. परंतु त्यांचं रेकॉर्डिंग पकडण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Dear Devendra Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old? If not, how is he eligible for taking the Vaccine? Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members? People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe said congress leader Srivatsa.

News English Title: Devendra Fadnavis Nephew Tanmay Fadnavis took corona vaccine even not eligible as per age news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या