27 December 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | जाणून घ्या उसाच्या रसाने होणारे शरीरास आरोग्यदायी फायदे । अधिक माहितीसाठी वाचा

benefits of sugarcane juice

मुंबई १९ एप्रिल : शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने खूप नुकसान होते. उसाचा रस हा शरीरात असलेल्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जगभरात सर्वात जास्त ऊस हा भारतात तयार केला जातो.उसाचा रस जास्त प्यायल्यास शरीरात संसर्गजन्य शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी आणि खोकला झाल्यास उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. तर असे काही आजार आहेत त्याच्या उपचारासाठी उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. चला तर मग आज आम्ही तुम्हांला उसाच्या रस प्यायल्यामुळे काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
उसाच्या रसाचे फायदे :

१. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

२. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.

३. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

४. उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.

५. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.

६. कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

७. उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणिबॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

८. उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

९. कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

१०. उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

News English Summary: Dehydration causes a lot of damage. Sugarcane juice is a great alternative to dehydration. India has the highest production of sugarcane in the world. It is advisable to drink sugarcane juice in case of cold and cough. So there are some diseases that are advised to drink sugarcane juice for its treatment. So today we are going to tell you about the benefits of drinking sugarcane juice.

News English Title: Sugarcane juice is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x