Health First | सतत हेडफोन वापरत आहात तर सावधान ! जाणून घ्या त्याची कारणे । अधिक माहितीसाठी वाचा
मुंबई १९ एप्रिल : आजच्या बदलत्या जीवनशैलीच्या जगात मोबाईल काळाची गरज बनला आहे. त्याशिवाय दिवस प्रत्येकाला अर्धा वाटतो. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल तासंतास वेळ व्यतीत करतात. विशेष म्हणजे मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची. बाजारात सध्या अनेक प्रकारचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. आणि अशा हेडफोन्सची क्रेझ तरूणांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. पण हे हेडफोन्स आपल्या आरोग्यास अत्यंत घातक असतात. त्यामुळे हेडफोन्सचा वापर फक्त कामापूरता करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. त्यामुळे जाणून घ्या हेडफोनचे दुष्परिणाम
ऐकण्याची क्षमता कमी होते
तुम्ही नेहमी मोठ्या आवाजात हेडफोनने गाणे ऐकत असाल तर कान दुखण्याच्या तक्रारी येऊ शकतात. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि तरीही हेडफोनचा वापर करणे टाळले नाही तर तुम्ही बहिरेही होऊ शकता. यामुळे कान दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे दाखवावे. कारणे हेडफोन ऐकताना कान दुखणे हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. आपल्या कानांची ऐकण्याची एक क्षमता असते. 90 डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकणे कानांसाठी हानिकारक असते. मोबाईलमध्येही आवाज वाढवताना एक नोटीफिकेशन येते की, यापेक्षा आवाज वाढवल्यास कानांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या नोटीफिकेशनकडे दुर्लक्ष करु नका. त्यापेक्षा जास्त आवाज वाढवू नका.
इन्फेक्शनचा धोका
काही जणांना हेडफोनचे व्यसनच लागते. हेडफोन लावले नाही तर त्यांचे डोके दुखायला लागते. सततच्या हेडफोनमुळे त्यांना लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. यामुळे त्यांनाही मोठ्या आवाजाने बोलण्याची सवय लागते. हेडफोन इतरांसोबत शेअर करु नये. यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून होणाऱ्या आजारांचे संक्रमण थांबवता येते. दुसऱ्याचे हेडफोन घेण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तर ते हेडफोन आधी नीट स्वच्छ करावे मगच कानात घालावे.
आरोग्यावर घातक परिणाम
काही जणांना हेडफोनचे व्यसनच लागते. हेडफोन लावले नाही तर त्यांचे डोके दुखायला लागते. सततच्या हेडफोनमुळे त्यांना लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. यामुळे त्यांनाही मोठ्या आवाजाने बोलण्याची सवय लागते. ज्याचे अनेक तोटे आहेत. अशा लोकांना रात्री नीट झोपही लागत नाही. ज्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात.
News English Summary: In today’s changing lifestyle world mobile has become a necessity of the times. Without it everyone feels half the day. From children to adults, everyone spends hours on mobiles. The special thing that is attached to the mobile is the headphones. There are many types of headphones available in the market right now. And the craze for such headphones is huge among the youth. But these headphones are extremely dangerous to your health.
News English Title: Using headphones regularly is not safety to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल