22 November 2024 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

१८ वर्षावरील तरुणांनाही लस मिळणार | पण आपल्या पप्पू पंतप्रधानांनी ६ कोटी लस आधीच परदेशात दिल्या आहेत - काँग्रेस

Congress leader Srivatsa

बंगळुरू, २० एप्रिल: केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच व्हॅक्सीन दिली जाणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र करोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आजही लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांना लस मिळालेली नाही. त्यात आता तिसरा टप्पा देखील जाहीर झाल्याने लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मुंबईसहित देशातील अनेक शहरं आणि गावात लसीकरण केंद्र लस पुरवठ्याभावी बंद आहे. त्यात देशात सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरु असताना मोदी सरकारने तब्बल ६ कोटी लस निर्यात केल्या आहेत. परिणामी देशात मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आता लसीकरण 18+ वरील नागरीकारांसाठी लागू झाले आहे, पण हे लक्षात ठेवा, आपल्या पप्पू पंतप्रधानांनी 6 कोटी भारतीय लसींची निर्यात केली आहे आणि आता लस टंचाईमुळे राज्यांना परदेशी लसींची आयात करण्याची परवानगी दिली जात आहे. आता कल्पना करा की किती लोकांचे व कुटुंबांचे जीव 6 कोटी लस वाचू शकल्या असत्या?

 

News English Summary: On a day Vaccination has been opened to 18+, Let’s remember that our Pappu PM EXPORTED 6 crore Indian Vaccines and Is now allowing states to IMPORT Foreign Vaccines as there is a shortage Imagine how many lives & families 6 crore Vaccines could have saved said congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa criticized PM Narendra Modi over export of corona vaccine news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x