22 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health first | उन्हाळ्यात प्या कोकमाचे सरबत आणि जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

benefits of kokum syrup

मुंबई २० एप्रिल : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.

कोकमचे फळ हे गोवा आणि गुजरात येथे सर्वाधिक आढळते. हे एक रसदार फळ आहे जे शरीराच्या उष्णतेला थंडावा देते. या फळांची साले सुकवून टेवली जातात. कोकमाचा वापर डाळ, भाजीमध्ये प्रामुख्याने केला जातो. कोकम चिंचेप्रमाणे आंबट असते.

जाणून घ्या याचे फायदे:

  1. कोकम सरबताच्या सेवनाने चयापचय क्रिया चांगल्या पद्धतीने काम करते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.
  2. कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडयासोबतच अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते.
  3. कोकमच्या फळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यात मदत करतात. याशिवाय तुम्हाला हेल्दी बनवतात.
  4. कोकमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते. कोकमामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स अजिबात नसते.
  5. कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो.

 

News English Summary: These are summer days. There is constant thirst during summer days. Many are not tempted to drink cold drinks at this time. However, this cold drink is extremely harmful to your body. Home drinks should be preferred in such cases. Lemon syrup, sand syrup, kokum syrup are extremely beneficial to drink in summer. In summer, along with lemon syrup, kokum syrup is also preferred. Kokum syrup helps if you want to lose weight.

News English Title: Kokum syrup is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x