22 November 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Corona Pandemic | पुढचे ३ आठवडे निर्णायक, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सावधतेचा इशारा

India corona pandemic

नवी दिल्ली, २० एप्रिल: सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.

दुसरीकडे वाईट गोष्ट म्हणजे संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 1.80 लाखांच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 80 हजार 550 लोकांनी जीव गमावला आहे. दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत देश पुन्हा एकदा टॉपवर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. ब्राझीलमध्ये सध्या दररोज जवळपास 1,500 लोकांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेमध्ये हा आकडा 400-600 एवढा आहे. भारतात सोमवारी 1,757 रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्च स्थरिया बाठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. यानंतर, कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे.

याशिवाय, त्यांनी सर्व राज्यांना, अॅडव्हान्समध्ये 3 आठवड्यांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. तसेच गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी बाजारांमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.

 

News English Summary: The number of corona sufferers in the country seems to be steadily increasing. Against this backdrop, Union Home Secretary Ajay Kumar Bhalla, Member of the Policy Commission Dr. VK Paul and Health Secretary Rajesh Bhushan held a high-level meeting on Tuesday. It was attended by the Chief Secretaries of all the Union Territories. After that, the next three weeks will be crucial in the fight against Corona, and everyone will have to be very careful during this time, he said. VK Paul has said.

News English Title: Next 3 weeks are very crucial for nation due to corona pandemic union govt gave alert to all states news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x