मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार हे जाहीर होताच अचानक मोदींनी जनतेला संबोधित केलं? - सविस्तर वृत्त
नवी दिल्ली, २१ एप्रिल: काेरोनावर मात करताना अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून केंद्र ३० एप्रिलनंतर मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प. बंगाल विधानसभा व उप्र पंचायत निवडणुका २९ रोजी संपत आहेत. यानंतर तत्काळ निर्णय लागू होऊ शकतात. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता यासाठी नवीन मॉडेल तयार केले जात आहे. ४० कोटी लोकांना लसीचे कवच देऊन वाहतुकीचे निर्णय मंत्रालये घेतील. २९ एप्रिलपासूनच याची अंमलबजावणी होऊ शकते.
गेल्या वर्षी २९ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक-२ च्या मॉडेलची पुन्हा अंमलबजावणी होऊ शकते. त्यात अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू राहण्यासाठी आवश्यक बाबी कठोर दिशानिर्देशांसह सुरू करण्यात आल्या होत्या. सर्व अनावश्यक बाबींवर निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. या मोहिमेची जबाबदारी एका टास्क फोर्सकडे सोपवली जाऊ शकते.
रात्रीचा कोरोना कर्फ्यू देशभर लागू होऊ शकतो
केंद्र सरकार रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात कोरोना कर्फ्यू लावू शकते, पण आवश्यक गोष्टींना सूट राहील. रेल्वे, बस, विमानाने, कारखान्यांतून परतणाऱ्यांना घरी जाण्यासाठी ऑटो-टॅक्सी सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
देशातील पहिल्या लॉकडाऊनवेळेची चूक;
देशात पहिला लॉकडाऊन जाहीर करतेवेळी मोदी सरकारने कोणतेही पूर्वनियोजन केलं नसल्याचं सिद्ध झालं होतं. तसेच मोदी सांगत असले तरी मोदींनी लॉकडाऊन जाहीर करताना उशीर केला होता हे देखील वास्तव आहे. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात सर्वच राज्यांमध्ये स्थिती गंभीर होतं असताना स्मशान भूमी आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. मात्र संपूर्ण देशात महाराष्ट्र सरकार पूर्व नियोजन करून केंद्राची वाट न पाहता योग्यवेळी निर्णय घेत असल्याने मोदी सरकारची भविष्यात कोंडी होऊ शकते आणि त्यात निवडणुका असल्याने पुढचे १० दिवस कसे मारून घ्यायचे असा पेच केंद्राकडे निर्माण झाला आहे, कारण देशात १० दिवसानंतर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. मात्र राज्य सरकार आधीच निर्णय घेत असल्याचं दिसल्याने मोदी लगेच LIVE आल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना स्थितीच्या संदर्भाने संवाद साधला. ते म्हणाले, लॉकडाऊन अंतिम पर्याय असायला हवा. देशातील कोरोना स्थिती चिंताजनक होत चालली आहे. याच मुद्द्याला धरून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन नको, असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत राज्यसरकार आपला निर्णय रद्द करणार की कायम ठेवणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात कोरोनाची वाढती संख्या कमी होत नाही आहे. या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने आजपासुन कडक लॉकडाऊन लागू होणार असे संकेत दिले होते. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला असेही काल काही मंत्र्यांनी सांगितले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. ही घोषणा होते न होते तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे.
यात लॉकडाऊन देशाला परवडणारे नाही, त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका जाहीर केली. त्याच बरोबर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवा ही भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी पाहता राज्यसरकार स्वतःचा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या निर्णय वर ठाम राहत का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक दैनंदिन मृत्यू महाराष्ट्रात आहेत, अशा परिस्थितीत राज्यात ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरची कमतरता भासत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावावा याबाबत सर्व मंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतली. अखेर मंत्रिमंडळात याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदींच्या संवादातील मुद्दे;
- राज्यांना आवाहन… देशाला लॉकडाऊनपासून देशातील नागरिकांनी मिळून वाचवायचे आहे. आता कंटेनमेंट नव्हे, मायक्रो कंटेनमेंट झोन करून देश वाचवायचा आहे.
- कामगारांना आवाहन… तुम्ही सध्या जेथे आहात तेथेच थांबा. राज्य सोडू नका. या कामगारांचा रोजगार थांबणार नाही याची राज्यांनी त्यांना हमी द्यावी. या सर्वांना येथेच लस दिली जाईल.
- युवकांना… आपल्या घरी, शेजारी टास्क फोर्स म्हणून काम करा. कोविड प्रोटोकॉल पाळण्यासाठी कुटुंबाला सातत्याने आठवण करून द्या.
- राम आणि रमजान… मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा संदेश आहे की, आपण मर्यादांचे पालन करायला हवे. रमजान सुरू आहे, यातून संयम राखण्याची शिकवण मिळते.
- लक्ष्य : लसीकरण आणि अर्थव्यवस्था सावरावी
- पद्धत : गावात गर्दीची ठिकाणे नियंत्रित करणे
- ध्येय : साखळी तोडून या संसर्गावर नियंत्रण
News English Summary: The Center is preparing to take major decisions after April 30 so that the economy does not collapse while overcoming Carona. W. Bengal Assembly and Upper Panchayat elections are coming to an end on the 29th. Immediate decisions can then be made. A new model is being created based on the experience of the last lockdown. Ministries will take transport decisions by vaccinating 40 crore people. It can be implemented from April 29.
News English Title: Maharashtra CM Udhav Thackeray may announce lockdown today over corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल