17 April 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Maharashtra Lockdown | लग्न समारंभासाठी नवी नियमावली

Maharashtra Lockdown

मुंबई, २२ एप्रिल: राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रेक द चेन च्या कडक निर्बंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कडक निर्बंध १ मेपर्यंत असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे या आधी संकेत दिले होते. आज त्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे लग्न कार्यासाठी नवी नियमावली?

आता लग्नासाठी लोकांच्या संख्येची नाही तर वेळेचीही मर्यादा लागू केली आहे. आता केवळ २ तासचं लग्नासाठी देण्यात आले असून केवळ २५ लोकांचं परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

यापूर्वी लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती १०० वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचला आहे. त्यातील 32 लाख 68 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The ministers had hinted after a cabinet meeting yesterday that the lockdown would be issued as the number of corona patients in the state continues to rise. Since then, yesterday (April 21) the government has announced new regulations.

News English Title: Maharashtra lockdown new guidelines for wedding ceremony news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या