नाशिक | झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका भाजपच्या सरकारने दिल्याचं स्पष्ट
नाशिक, २२ एप्रिल: नाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात काल ऑक्सिजन गळती झाल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला आहे . या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला होता. हाच टँक बुधवारी लीक झाला. हा टँक लिक होऊन अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा बंद होता. पण, कुटुंबियांचा आरोप आहे की, हा पुरवठा दोन तास बंद होता.
घटना घडताच टेक्निशियनला फाेन करा, असा ओरडा सुरू झाला. त्याला अनेकांनी फाेनही केला. मात्र सुरुवातीला ताे देखील बराचवेळ बिझी आला. ते येईपर्यंत ऑक्सिजन एवढा पसरला हाेता की, शेजारचा माणूसही दिसेना. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला. पण, त्यामुळेही धूर कमी हाेईना. ऑक्सिजन गळतीची जागा काही सापडेना अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती.
दरम्यान, भाजपाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेतील वास्तव अखेर समोर आलं आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे महापालिकेचे असून, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. संवेदनशील विषय असताना देखील संबंधित ठेकेदारांचा टेक्निशन तेथे उपलब्ध झाला नाही.
सदर रुग्णालयात महापालिकेने १५ ते २० दिवसांपूर्वीच ऑक्सिजनची टाकी बसवली होती. ठेकेदारामार्फत या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. या रुग्णालयाचे सारे संचालन महापालिकेमार्फत चालते, असे असताना या दुर्घटनेनंतर भाजप नेते राज्य सरकारवर टीका करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले आणि या आपत्तीतही भाजप नेत्यांचा खरा चेहरा सामान्यांना पाहायला मिळाला.
महापालिकेने जुन्या नाशकातील कथडा भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत ठेवले आहे. १५० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात बुधवारी सकाळी क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे १५७ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. एकूण रुग्णांपैकी ६३ रुग्ण हे अतिगंभीर होते. दुपारच्या सुमारास येथील ऑक्सिजन टाकीला गळती लागली आणि एकच धांदल उडाली. त्याची तांत्रिक दुरुस्ती होईपर्यंत ऑक्सिजनवर असलेल्या २२ जणांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
News English Summary: The reality of BJP-ruled Nashik Municipal Corporation has finally come to light. Dr. Zakir Hussain Hospital belongs to NMC and BJP is in power in NMC. The municipal corporation had contracted to install oxygen tanks in New Bitco and Zakir Hussain Hospitals. The technicians of the concerned contractors were not available there even when it was a sensitive subject.
News English Title: BJP ruling party was appointed contractor for gas supply in Nashik Zakir Hussain hospital news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार