22 November 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

जनतेत अतिराष्ट्रवाद आणि येथील राजकीय नेत्यांच्या लोकानुनयातून आजचे गंभीर संकट निर्माण झाले - तज्ज्ञांची परखड मतं

India corona pandemic

नवी दिल्ली, २३ एप्रिल: देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

देशात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

बी. १.६१७ नावाच्या या नव्या विषाणूत असामान्य म्युटेशन ई ४८४ क्यू व एल ४२५ आर आहे. त्याला डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हटले जात आहे. तो वेगाने बाधित करू लागला आहे. परंतु कोरोनाविरोधात मिळालेल्या वेळेचा भारताने अपव्यय केला. म्हणूनच कोरोनाने महाप्रलयाचे रूप धारण केले, असे संशोधकांना वाटते.

विज्ञानाच्या म्हणण्यानुसार लोकांची गर्दी होण्यापासून रोखावे. मग हजारो लोकांना जाहीर सभांतून एकत्रित का येऊ दिले गेले? म्हणूनच अशा स्थितीत सभांचे आयोजन विज्ञानदृष्ट्या तर्कसंगत कसे का? असं मत त्रिवेदी स्कूल ऑफ बॉयोसायन्सचे संचालक डॉ. शाहिद जमील यांनी व्यक्त केलं आहे.

भारतात नेहमीच अयोग्य अधिकाऱ्यांचा हेका दिसून येतो. जनतेत अतिराष्ट्रवाद व येथील राजकीय नेत्यांच्या लोकानुनयातून आजचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ही शक्यता नेहमीच वाटायची. परंतु ते हाताळण्याची तयारी मात्र कधी केली नाही असं ब्लूमबर्गचे स्तंभलेखक मिहिर शर्मा यांनी म्हटलं आहे.

भारताने ब्राझील व ब्रिटनमधील दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवरून काहीही धडा घेतला नाही. काहीही तयारी केली नाही. आधी दक्षता बाळगणारे लोक दुसऱ्या लाटेत बेपर्वा झाले. हे सुपरस्प्रेडर बनले असं मत मिशिगन युनिव्हर्सिटीचे बायोस्टॅटिस्टियन, एपिडेमिअोलॉजी तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Today’s serious crisis has been created due to the nationalism of the people and the people of the country. This possibility was always felt. But Bloomberg columnist Mihir Sharma says he was never prepared to handle it.

News English Title: Today’s serious crisis has been created due to the nationalism of the people and the people of the country news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x