23 November 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

कोरोना आपत्ती | दिलासादायक... एका दिवसात 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले

India corona pandemic

मुंबई, २३ एप्रिल: भारतात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांवर पोहचला आहे. दरम्यान, यामध्ये एका 2 हजार 256 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी देशात 2 हजार 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यादिवशीचा कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाख 15 हजारांवर होता. भारत देश कोरोना महामारीचे नवीन सक्रीय रुग्ण आढळण्यात जगात पहिल्यानंबर आला असून त्यानंतर अमेरिका आणि ब्राझीलचा नंबर येत आहे.

देशात वाढता कोरोना महामारीचा संसर्ग पाहता देशातून एक दिलासा देणारी बातमी आली आहे. दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासांत 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे हा आकडा महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी गुरुवारला रेकार्ड ब्रेक 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले होते. त्यामुळे देशात वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच बरे होणाऱ्या लोकांचा आकडादेखील वाढतच आहे.

देशात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे सक्रीय रुग्णांचा आकड्यांतदेखील वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रीय रुग्णांचा आकडा 25 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये गुरुवारी 1 लाख 37 हजार 671 सक्रीय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशात 24 लाख 22 हजार 80 लोकांवर उपचार सुरु आहेत.

 

News English Summary: Outbreaks of corona epidemic are on the rise in India. In the last 24 hours, 3 lakh 32 thousand 320 new patients have been found in the country. It is noteworthy that for the second day in a row, the number of corona victims has reached 3 lakh. Meanwhile, a total of 2,256 people have been killed. Earlier on Wednesday, 2,101 people died in the country and the number of corona infections on that day was over 3 lakh 15 thousand.

News English Title: India corona crisis now reached on it’s highest level of corona active patients count news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x