23 November 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Health First | संधिवाताच्या समस्येवर करा हे योग्य उपचार । नक्की वाचा

home remedies for arthritis

मुंबई २४ एप्रिल : अनेक कारणांमुळे संधिवात निर्माण होतो. संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते.
साधारणपणे वाढत्या वयानुसार कार्टिलेजची क्षमता कमी होते, झीज वाढत जाते. त्यामुळे संधिवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक आहे. सांधे दुखणे, सांध्यांची हालचाल योग्य रितीने न होणे, तसेच चालताना, वाकताना, उठताना, बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे यामध्ये वेदना निर्माण होतात. ही सर्व लक्षणे उतारवयामध्ये वेदना निर्माण करणारी आहेत.

कारणे:

– वाढत्या वयामुळे संधिवाताचा त्रास होतो. साधारणतः साठ वर्षानंतर हा त्रास वाढता असल्याचे दिसून येतो.

– लठ्ठपणामुळे संधिवात होण्याचे प्रमाण वाढते.

– वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार हा गुडघ्यावर, खुब्याच्या सांध्यावर पडत असतो.

– व्यायामाचा अभाव असल्यास कार्टिलेजची क्षमता कमी होते.

– हाडाचे फ्रॅक्चर असल्यास हा त्रास वाढतो.

– दोन सांध्यांमध्ये गॅप असल्यास ही स्थिती निर्माण होते.

– शरिरातील संप्रेरकातील (हार्मोनल) बदल, रजोनिवृत्ती यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता अधिक असते.

संधिवातमुळे सांध्यातील वेदना सुरु होतात. हाडांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखी डोकेवर काढते. मात्र, यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले तर त्यावर आराम मिळतो. हे उपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. खालील नैसर्गित उपचार पद्धती तुम्हाला आराम देऊ शकतात.

व्यायामावर भर द्या
आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज आहे. तसेच व्यायामुळे संधीवात दूर होण्यास मदत होते. परिणामी आपले स्नायु अधिक बळकट होतात. तर सांधे लवचिक राहतात. व्यायामामुळे शरिरातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

गरम आणि थंड थेरपीचा उपयोग करा
संधिवातामुळे होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी गरम आणि थंड थेरपीची मदत घ्या. संधिवातमुळे होणाऱ्या वेदनांचा यामुळे फरक दिसून येईल. आंघोळ करताना गरम पाणी घ्या. झोपण्यासाठी घोंगडी किंवा गरम पॅडचा वापर करा. त्यामुळे ऊब मिळते तर थंड उपचारही एक चांगली थेरपी आहे. यात बर्फाचा वापर करावा. वेदनापासून सुटका मिळण्यासाठी ही थेरपी चांगली. टॉवेलमध्ये बर्फ घेऊन त्याचा शेक घ्यावा. त्यामुळे चांगला आराम मिळतो.

अॅक्युपंक्चर पद्धत
अॅक्युपंक्चर ही थेरपी आपल्यासाठी चांगली आहे. यामध्ये आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारे पातळ सुयाने टोचने. एक प्राचीन चिनी वैद्यकीय उपचार आहे. सुज कमी करणे किंवा रक्ताभिसरण होण्यासाठी ही पद्धत अवलंबिली जाते. हे अॅक्यूपंक्चर संधिवात वेदना कमी करण्याची क्षमता आहे.

ध्यान धारणा करा
ध्यान धारणा केल्याने तणावातून सुटका होते. तसेच विश्रांती मिळते. यातून आपण संधिवातावर नियंत्रण मिळवू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) यांच्या मते ध्यान केल्याने वेदनादायक सांधेदुखीवर आराम मिळतो. केलेल्या संशोधनातून स्पष्ट झालेय की, नैराश्य आणि संधिवातावर याचा फायदा मिळतो.

पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी
रोजच्या जीवनात आपण जे खातो त्याचा उपचारासाठीही उपयोग होऊ शकतो. लवंगा, दालचिनी, जिरे, मोहरी, धने, सुंठ, पुदिना, मनुका. सांधेदुखीवर उपचार करताना पचन सुधारणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे शरीरात ‘आम्ल’ निर्मिती होणार नाही. दोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे दोन- तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे.

News English Summary: Arthritis is caused by a number of factors. Rheumatoid arthritis is also called arthritis. The joints contain a component called cartilage. This cartilage allows the joints to move properly. When the cartilage is damaged for any reason, the joint pain increases and the pain becomes unbearable. The bones in the joints rub against each other, causing swelling in the knees. This condition is called arthritis or osteoarthritis.

News English Title: Best remedies for Arthritis news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x