25 November 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

सॅनिटायझरने हात धुवून कोरोना गेला नाही, एकदा भाजप पासून हात धुवून बघा - काँग्रेस

MLA Bhai Jagtap

मुंबई, २४ एप्रिल: देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोकळीक आणि हलगर्जीपणामुळे दुसरी लाट ही अनियंत्रित झाली आहे. सरकार गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधणे घालण्यात अपयशी ठरली. लस खरेदी करणे आणि व्हायरसच्या रिसर्चसाठी पैसे देण्याचे निर्णय उशीरा आले.

साथीच्या रोगाची दुसरी भयावह लाट केवळ भारतच नाही तर जगासाठीही विनाशकारी ठरू शकते. विषाणूच्या अनियंत्रित प्रसारामुळे धोकादायक नवीन स्ट्रेन उद्भवण्याचा धोका वाढत आहे. भारतात पहिल्यांदाच यूएस, ब्रिटनसह इतरही अनेक देशांमध्ये डबल म्युटंट ओळखल्या जाणार्‍या व्हायरसचा नवीन प्रकार आढळला आहे. भारताच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम जगाच्या इतर भागात लसींच्या पुरवठ्यावर झाला आहे. संक्रमण वाढल्यावर सरकारने व्हॅक्सीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाची पहिली लाट आली आली तेव्हा मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता आणि तेव्हा मास्क लावणे आणि सॅनिटायझरने हात धुण्याव्यतिरिक्त कोणताही उपाय नव्हता. त्यानंतर दुसरी लाट यायची ती आलीच आणि ती देखील अत्यंत भीषण स्थितीत असंच म्हणावं लागेल.

याच विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे कि, “साबुन सैनिटाइजर से हाथ धोकर करोना नही भागा… एक बार भाजपा से हाथ धो कर देखो.. कोरोना के साथ मंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार सब भाग जाएंगे..!!

 

News English Summary: Following this issue, Mumbai Congress president MLA Bhai Jagtap has strongly criticized the BJP. In this regard, while tweeting, Bhai Jagtap has said, “Corona Don’t run away by washing your hands with soap and sanitizer now try to hand wash from BJP party.

News English Title: Mumbai congress president MLA Bhai Jagtap slams BJP party over current corona pandemic in India news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x