परमबीर सिंग म्हणालेले वाझेला सांगितले पण त्याने ते ऐकले नाही, जर अपराधच घडला नाही तर धाडी कसल्या? - काँग्रेस
मुंबई, २४ एप्रिल: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मग गुन्हा आणि धाडी का टाकल्या असा भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली असताना काँग्रेसने देखील या कारवाईवरून संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील टीका करताना काही प्रश्न देखील उपस्थित केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना सचिन सावंत म्हणाले की, “CBI’ने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करेल हे अभिप्रेत होतेच. या संस्थानी केलेली कारवाई म्हणजे आता जोक झाला आहे. मोदी सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या अपयशापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि मविआ ला बदनाम करण्याकरिता ही मोदी सरकारच्या निर्देशाने केलेली राजकीय नौटंकी आहे.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “ज्यांच्या बोलण्यावरून गुन्हा दाखल झाला तो वाझे स्वतः गुन्हेगार आहे. परमबीर सिंह यांनी आयुक्तअसताना माहिती कळल्यावर गुन्हा दाखल केला नाही यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वाझे म्हणतो की त्याला सांगितले पण त्याने ऐकले नाही. जर अपराधच घडला नाही तर धाडी कशावर टाकता? हे सर्व कुभांड आहे”.
ज्यांच्या बोलण्यावरून गुन्हा दाखल झाला तो वाझे स्वतः गुन्हेगार आहे. परमबीर सिंह यांनी आयुक्तअसताना माहिती कळल्यावर गुन्हा दाखल केला नाही यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वाझे म्हणतो की त्याला सांगितले पण त्याने ऐकले नाही. जर अपराधच घडला नाही तर धाडी कशावर टाकता? हे सर्व कुभांड आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 24, 2021
News English Summary: After the CBI raid on the properties of former state Home Minister Anil Deshmukh, the NCP has become very aggressive. Many NCP leaders have expressed doubts about the Modi government over this action. The Supreme Court had only ordered a preliminary inquiry. Then the BJP has been attacked for committing crimes and raids.
News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized Modi Govt over CBI raided on Anil Deshmukh house news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार