22 April 2025 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भारताची परिस्थिती दयनीय, जगाने मदत केली पाहिजे - ग्रेटा थनबर्ग

Greta Thunberg

स्टोकहोम, २५ एप्रिल: गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे.

विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतात सध्या कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडन येथील हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्व‍िट करत भारत देशातील ऑक्सिजन कमरतेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, ‘भारत देश सध्या कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून जात आहे. यामुळे देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदींची कमतरता भासत आहे. त्यामुळे जगाने पुढाकार घेत कोरोनाच्या लढाईत संघर्ष करणार्‍या भारत देशाला मदत केली पाहिजे.’ असे आवाहन तीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला केले.

 

News English Summary: Heartbreaking to follow the recent developments in India. The global community must step up and immediately offer the assistance needed said Greta Thunberg over India corona pandemic news updates.

News English Title: The global community must step up and immediately offer the assistance needed said Greta Thunberg over India corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या