22 November 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

वर्षभरात १ लाख नागरिकांच्या मृत्यूनंतर PM केअर निधीचा वापर केल्याबद्दल मोदींचे धन्यवाद - काँग्रेस

congress leader Srivatsa

बंगळुरू, २५ एप्रिल: देशात वाढत असलेल्या ऑक्सीजनच्या मागणीमुळे नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्मय घेतला आहे. या निर्णयानुसार, देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सीजन प्लांट लावले जाणार आहेत. हे ऑक्सीजन प्लांट लावण्यासाठी PM केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, रुग्णालयातील ऑक्सीजन वाढवण्यासाठी PM केअर्स फंडने सार्वजनिक आरोग्य सुविधेत 551 डेडिकेटेड प्रेशर स्विंग अँड्सॉर्प्शन मेडिकल ऑक्सीजन जेनरेशन प्लांट लावण्यासाठी फंडला मंजुरी दिली आहे.

यापूर्वी, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ऑक्सीजनची उपलब्धता वाढवण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. यात त्यांनी मेडिकल ग्रेड ऑक्सीजनची क्षमता वाढवण्यासोबतच घर आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तुंची पुर्तता करण्यावर जोर दिला होता. त्यांनी सर्व मंत्रालय आणि विभागांना ऑक्सीजन आणि मेडिकल सप्लायच्या उपलब्धतेसाठी कामात ताळमेळ ठेवण्यास सांगितले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, 3 महीन्यांसाठी ऑक्सीजनशी संबंधित वस्तु आणि उपकरणांच्या आयातीवर बेसिक कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस लावला जाणार नाही. याबाबत मोदींनी महसूल विभागाला अशा उपकरणांच्या इंपोर्टवर लवकरात लवकर कस्टम क्लीयरेंस देण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, कोरोनाच्या लसींच्या आयातीवरील बेसिक कस्टम ड्यूटीला 3 महीन्यांसाठी बंद केले जावे.

दरम्यान, PM केअर्स फंडचा वापर सुरु केल्यानंतर काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना श्रीवत्सा म्हणाले की, “आम्ही ऑक्सिजनची धावपळ केल्यानंतर तुम्ही ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी मान्यता दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत… एक वर्षात कोरोनामुळे १ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पीएम केअर निधीचा वापर केल्याबद्दल मोदींचे धन्यवाद…. भारताला कोरोना विश्वगुरू बनवल्याबद्दल मोदींचे धन्यवाद!

 

News English Summary: Thank You PM Narendra Modi for finally using PM CARES fund after a year and after lakhs have died. Thank You PM Narendra Modi for finally sanctioning construction of Oxygen Plants after we have run out of Oxygen. Thank You PM Narendra Modi for making India the Vishwaguru in Corona Cases said congress leader Srivatsa news updates.

News English Title: Thank You PM Narendra Modi for finally using PM CARES fund after a year and after lakhs have died said congress leader Srivatsa news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x