कोरोना त्सुनामीत मोदी सरकार हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | लोकांचे मृत्यू त्यांच्यासाठी केवळ आकडे - केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती
नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत. मृतांची प्रत्यक्षातील संख्या सरकारी आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे. जगातील जवळपास निम्मे रुग्ण भारतात आढळत आहेत. तज्ञांच्या मते, संसर्गाचे खरे चित्र समोर आणले जात नाही. दरम्यान, काही समीक्षकांच्या मते, खरी संख्या लपवण्यासाठी राज्य सरकारांवर केंद्राचा दबाव आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.
एका ऑनलाईन चर्चेदरम्यान परकला प्रभाकर यांनी हे मत व्यक्त केले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले.
या परिस्थिती केंद्र सरकार आणि त्यांच्या उपाययोजनांचे मूल्यमापन होण्याची गरज आहे. मात्र, त्यांना केवळ आपल्या लोकांच्या मृत्यूचे दु:ख आहे. इतरांचा मृत्यू त्यांच्यासाठी निव्वळ आकडा आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला धोरणात्मक सल्ला दिला होता. पण एका केंद्रीय मंत्र्याने तो असभ्य भाषेत धुडकावून लावला आणि त्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले.
अर्थतज्ज्ञ असलेल्या परकला प्रभाकर यांनी म्हटले की, कोरोना संकटामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. रुग्णालयात उपचार करावे लागत असल्याने लोकांनी साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर अनेक लोक पुन्हा उभे राहू शकत नाहीत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेला आहे. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तव परिस्थिती यापेक्षा भयानक आहे, असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला.
News English Summary: After the second wave of corona hit the country haha: now the central government is being targeted. Against this backdrop, Union Finance Minister Nirmala Sitharaman’s husband Parkala Prabhakar has sharply criticized the Modi government. He has criticized the Modi government for not taking measures instead of stopping Corona and engaging in headline management.
News English Title: Union Finance Minister Nirmala Sitharaman’s husband Parkala Prabhakar has criticized the Modi government over corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल