22 November 2024 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाने देशात लाखो लोकांचा मृत्यू | पत्रकाराच्या टीकेला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले ‘घाबरु नका, येणार तर मोदीच

Anupam Kher

नवी दिल्ली, २६ एप्रिल: ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्यामध्ये ट्विटरवर खडाजंगी झाली. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी ‘घाबरु नका, येणार तर मोदीच’ असं उत्तर दिलं. अनुपम खेर हे समाज माध्यमांवर अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं उघडपणे समर्थन करताना दिसतात. वास्तविक ते मोदी भक्त असल्याचं सर्वश्रुत असून, कोणत्याही परिस्थित मोदी समर्थन हेच त्यांचं अंतिम लक्ष असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.

काय म्हणाले अनुपम खेर ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देताना;

शेखर गुप्ताजी, हे जरा अतीच झालं. अगदी तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. कोरोना ही आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. या महामारीचा सामना आपण यापूर्वी कधीच केला नव्हता. सरकारवर टीका करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर आरोप, टीका-टिपणी जरुर करा. पण त्याच्याशी (कोरोना) सामना करणं ही आपलीही जबाबदारी आहे. तसं तर घाबरु नका. येणार तर मोदीच !! जय हो!” अशा आशयाचं ट्वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.

मात्र, आजच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर संतापले आहेत. त्यांनी खेर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेटिझन्स याच ट्विटवर अनुपम खेर यांना फैलावर घेतं आहेत. तसेच एवढ्या भीषण स्थितीत देखील ‘घाबरु नका, येणार तर मोदीच’ असं म्हणणं म्हणजे निर्दयी राजकारणी माणसाचं उदाहरण म्हणावं लागेल असं अनेकांनी म्हटलं आहे.

एकाने तर अनुपम खेर यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हटले आहे. अन्य एका युजरने लिहिले की, अनुपम खेर यांनी आपला खरा रंग दाखविला. अनुपम खेर यांचे हे ट्विट अभिनेते परेश रावल यांनीदेखील रिट्विट करत तुम्ही देखील त्या टीकाकारासारखे बनू नका, असा सल्ला दिला आहे. त्यावर नेटिझन्सनी त्यांना देखील खडेबोल सुनावले आहेत.

 

News English Summary: Shekhar Guptaji, this is a bit too much. Even more than your standard. Corona is a disaster. For the whole world. We have never faced this epidemic before. It is important to criticize the government. Make accusations and criticize them. But it is also our responsibility to deal with him (Corona). So don’t be afraid. If only Modi would come !! Hail! ” Anupam Kher has tweeted such content.

News English Title: Netizens slams Anupam Kher over his statement regarding Modi during India corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x