फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा, त्या यादीत महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश - सचिन सावंत
मुंबई, २६ एप्रिल: केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यासंदर्भात एक यादी ट्विट करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.
यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे दावे खोडून काढताना टीका केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीसजी आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.
तथ्य
महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे 1250 मे.टन आहे
केंद्राच्या मान्यतेने प्राप्त होत असलेला अॉक्सिजन
भिलाई 110 मे.टन /दिन
बेलारी 50 मे.टन /दिन
जामनगर 125 मे.टन/दिन
व्हायजॅग – 60 मे.टन सरासरी
ऑक्सिजन एक्सप्रेसने 7 टँकरने एकदा 110 मे.टन आणले आहे pic.twitter.com/jSHlmTbWJ4— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 26, 2021
पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, “एमव्हीए सरकारने 15 ते 30 एप्रिल या 15 दिवसांत 25000 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. 17500 मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला 7500 मे.टन म्हणजे 500 मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु 345 मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे…कृपया खोटे बोलणे थांबवा.
एमव्हीए सरकारने 15 ते 30 एप्रिल या 15 दिवसांत 25000 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. 17500 मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला 7500 मे.टन म्हणजे 500 मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु 345 मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे
कृपया खोटे बोलणे थांबवा pic.twitter.com/DF5oeN7pmx— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 26, 2021
News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant has criticized Devendra Fadnavis for refuting his claims. In it, he has said, “Devendra Fadnavisji, the list you are giving credit to Modiji includes projects in Maharashtra. Maharashtra has a generating capacity of 1250 MT. It does not need Modi’s permission. It is not appropriate to thank him for that.” The Modi government is cunning.
News English Title: Congress spokesperson Sachin Sawant slams Devendra Fadnavis over sharing number on Oxygen supply from Union govt news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार