22 November 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Health first | दुधात खारीक उकळवा आणि प्या, होतील आरोग्यदायी फायदे

benefits of milk with dry dates

मुंबई २६ एप्रिल : ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो.

खारीक आणि दुधात लपले आहेत अनेक आजारांवरील उपाय

हाडं मजबूत होतात:
खारीक आणि दूध दोन्हींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं, अशातच या दोन्हींचं एकत्र सेवन केलं तर हाडं मजबूत होतात. जेव्हा आपले हाडं मजबूत असतात तेव्हा आर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस किंवा हाडांशी निगडित कुठल्याही आजारापासून आपण दूर राहतो.

हेल्दी पोटासाठी खारीक आहे वरदान:
खारीकेत पोटॅशिअम आणि फायबर असतात त्यामुळे, जेवण सहजपणे पचतं. तर दूध पचनक्रियेत उपयुक्त असे एन्जाइम्स वाढवतं. दररोज याचं सेवन केल्यानंतर बद्धकोष्ठता, पोटदुखी सारख्या समस्या होत नाही.

वजन वाढविण्यासाठी:
जर आपल्याला वजन वाढवायचं आहे तर खारीक आणि दूध एकत्र अवश्य घ्यावं. खजूर पेक्षा अधिक कॅलरी खारीकेत असतात. जर याला दुधासोबत घेतलं, तर आपण बारीक राहणार नाही. डाएटमध्ये याचा समावेश केल्यानंतर १ महिन्यात आपल्याला वजनातील फरक जाणवेल.

शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी:
डायबिटीज असलेल्या रुग्णांना काही पदार्थ खाण्यावर बंधणं असतात. मात्र जर आपण खारीक खाल्ली तर शरीरातील साखरेचं प्रमाण योग्य राहिल. हेच कारण आहे की, डायबिटीजच्या रुग्णांना खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. दुधासोबत खारीक खाणं अतिशय फायदेशीर ठरतं.

दात राहतील मजबूत:
दुधासोबत खारीकेचं सेवन केल्यानंतर दातही मजबूत राहतात. कारण यात कॅल्शिअम आहे. त्यामुळे दातांना मजबूत बनवतं.

त्वचा आणि केसही सुदृढ बनवतात:
खारीक पावडर दुधात मिसळून खाल्ल्यानं त्वचा चमकदार होते. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता दूर करून रक्तप्रवाह चांगला ठेवण्यास मदत होते. याशिवाय जर आपले केस गळत असतील तर ही समस्या पण दूध-खारीकनं दूर होतं.

News English Summary: Just as raisins are made from dried grapes, so are dates made from dried dates. These dates are rich in nutrients. Which we can consume throughout the year.

News English Title: Drink milk with dry dates as its beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x