25 November 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

BREAKING | परमबीरसिंग एका पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी घ्यायचे १ कोटी - पोलीस अधिकाऱ्याचे आरोप

Senior police inspector R. Ghadge

मुंबई, २७ एप्रिल | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्रच घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे. परमबीरसिंग १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग तीन वर्षे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तिथे पोलिस निरीक्षक होते.

घाडगे यांनी पत्रात लिहिले आहे की, परमबीरसिंग यांनी पदाचा, अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे. दोन पोलिस कॉन्स्टेबल २० वर्षांपासून त्यांच्यासोबत खासगी व्यवहार पाहण्यासाठी व बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी आहेत. परमबीर यांनी बेनामी संपत्ती कोठे व कुणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत मला संपूर्ण माहिती आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्याच्या नावावर २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्यांच्या एका मित्रामार्फत १० ते १५ लाख रुपये घेऊन रिव्हॉल्व्हर लायसन्स दिले जात होते. त्यांच्यामार्फत बिल्डरची कामे कोट्यवधी रुपयांची सेटलमेंट करून दिली जात. जो अधिकारी त्यांचे ऐकत नव्हता त्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात येत होती. परमबीरसिंग यांनी माझ्याविरुद्धसुद्धा पाच खोटे गुन्हे नोंदवले होते. बदल्यांचे पैसे जमा करण्यासाठी राजू अय्यर नावाचा एजंट ठेवला होता. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासाठी ५० लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते.

दिवाळी भेट म्हणून त्यांनी डीसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, सहायक पोलिस निरीक्षकाकडून २० ते ३० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे व पोलिस निरीक्षकाकडून ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्किटे घेतली आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे त्यांनी बिल्डर बोमन इराणी आणि रुतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपरवजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. अवैध वाळू व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई केल्यास त्या पालिस अधिकाऱ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकवले जात होते. त्यामध्ये मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. याबाबत मी १७ मार्च २०१६ रोजी तक्रार दिलेली आहे. परमबीर यांनी त्यांचा मुलगा रोहन याच्या नावाने सिंगापूर येथे व्यवसाय सुरू केला असून त्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

अॅन्टालिया रोडवर त्यांनी ६३ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. परमबीर यांची पत्नी सविता यांच्या नावाने खेतान अॅन्ड कंपनी ही उघडली असून तिचे कार्यालय इंडिया बुल इमारत, ६ वा मजला, लोअर परेल, मुंबई येथे आहे. त्या कंपनीच्या संचालक आहेत. या कंपनीत पाच कोटींची गुंतवणूक आहे. माझ्याकडे असलेल्या तपासातील गुन्ह्यातील आरोपींची नावे काढून टाकण्याचे आदेश परमबीर यांनी दिले होते. ते न ऐकल्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील आरोपींची नावे काढून टाकण्यात आली. त्याबदल्यात त्यांनी २०० कोटींचा भ्रष्टाचार केला.

भीमराव घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. तसे न केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे घाडगे यांचे म्हणणे आहे. सध्या ते अकोला नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

News English Summary: Former Home Minister Anil Deshmukh has been accused of extorting Rs 100 crore per month from former Mumbai Police Commissioner Parambir Singh. R. Ghadge has dropped a letterbomb. Ghadge has written a letter to the Chief Minister, Home Minister, Director General of Police and Bribery Prevention Department asking them to investigate the corruption committed by Parambir Singh and file a case against him. Parambir Singh was the Commissioner of Police of Thane for three consecutive years from March 17, 2015 to July 31, 2018. Ghadge was also a police inspector there at that time.

News English Title: Senior police inspector R. Ghadge made serious allegations of corruption on Param Bir Singh news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x