22 November 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

रश्मी शुक्ला अडचणीत येताच भातखळकरांचे CBI मधील सूत्र कार्यरत | प्रथम भातखळकरांना दिली गोपनीय माहिती?

BJP MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, २८ एप्रिल | वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत.

दरम्यान, चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन, असं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला दिलं आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं. फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, याप्रकरणात फडणवीस देखील अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपमधील फडणवीसांच्या सांगण्यावर राजकीय धुरळा उडविणारे भाजप नेते सज्ज झाले आहेत. आपल्याच परिचयातील थर्ड पार्टी ब्लॉगवरून ‘डंका’ वाजवून पुड्या सोडण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. अगदी रश्मी शुक्ला यांनी सीबीआय’ला काय सांगितलं आणि कोणाची नावं घेतली याचं रिपोर्टींग थेट भाजप आमदार अतुल भातकळकरांकडे झाल्याची शक्यता सध्या त्यांच्या ट्विटवरून दिसत आहे.

अतुल भातखळकरांच्या सीबीआयमधील सूत्रांनी त्यांना दिलेल्या गुप्त माहितीनुसार हैदराबाद येथे झालेल्या सीबीआय चौकशीत रश्मी शुक्ला यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. अतुल भातखळकरांनी ट्विट मध्ये म्हटलंय की, “आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.”

वास्तविक, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली होती. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागलं आहे.

राज्यात पोलिस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असून त्यासंदर्भात गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने खळबळ माजलेली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल सार्वजनिक करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

मात्र त्या बदल्यांबाबतची वस्तुस्थिती:

  • १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात “भापोसे’च्या १६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ४ अपवाद वगळता सर्व पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवर झाल्या होत्या.
  • सप्टेंबर २ ते २८ आॅक्टोबर २०२० दरम्यान १५४ बदल्या झाल्या. पैकी १४० बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीने तर १० पदस्थापनेतील बदल सुचवून झाल्या.
  • ३१ मार्च २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात राज्य सेवेतील ८३ पोलिस अधीक्षकांच्या, १८६ उपअधीक्षकांच्या, ९६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यातील ९ बदल्या वगळता सर्व आस्थापना मंडळाच्या शिफारशीने झाल्या आहेत.

रश्मी शुक्ला यांनीच हा अहवाल उघड केला. या अहवालाची प्रत शुक्ला यांच्याकडची असावी. मात्र टाॅप सिक्रेट कागदपत्रे उघड करणे गंभीर बाब आहे. शुक्ला यांनी अहवाल उघड केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांना या अहवालात मुख्य सचिवांनी यापूर्वीच सूचित केले आहे.

 

News English Summary: IPS Rashmi Shukla has carried out several assassination attempts during the CBI probe in Hyderabad. It contains the names of two Anil, his Chelechpate and a big leader. Before the state government questioned Shukla, lady had completed her program said BJP MLA Atul Bhatkhlkar.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar tweet on Rashmi Shukla case regarding phone tapping news updates.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x