25 November 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | जाणून घ्या बद्धकोष्ठतेवर आहेत काही घरगुती उपाय

home remedies for constipation

मुंबई २८ एप्रिल : आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. पोट हा शरीराचा महत्वाचा घटक आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्‍धकोष्ठताची समस्या निर्माण होते. किंवा तिला आमंत्रण मिळते. बद्‍धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.

बद्‍धकोष्ठता होण्याचे मुख्य कारण:
1. पीणी कमी प्यायल्यामुळे बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
2. जास्त तेल आणि मसाल्यांचे पदार्थ सेवन केल्याने या समस्येला आमंत्रण मिळते. तसेच पोटाचे अन्य आजार उद्धभवतात.
3. सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्‍धकोष्ठता या सारखी समस्या निर्माण होते. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो.
4. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हे देखील बद्‍धकोष्ठतेचे कारण आहे. त्यामुळे संतुलित प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे.
5. पोट दुखी होत असेल तर पेन किलर टॅबलेट घेणे टाळा. पेन किलरचा जास्त वापर करणे योग्य नाही.

मग कराच बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय

एरंडेल तेल
एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.

अंजीर
सुके वा ओले अंजीर दोन्ही नैसर्गिकरीत्या रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातून शरीराला पुरेसे फायबर मिळतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही अंजीर दुधात उकळा हे मिश्रण रात्री प्यावे. बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा अख्खे अंजीर खाणे अधिक फलदायी ठरेल.

अळशी
अळशी तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. अळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा गरम पाण्यासोबत घेऊ शकता.

लिंबू
आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते

संत्र
संत्र हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.

News English Summary: It is very important that your stomach is always clean and well. The stomach is an important part of the body. If your stomach is not clean, you will face many diseases. Changing lifestyles often lead to constipation. Or she gets an invitation. If you take some home remedies to get rid of constipation, you will get rid of it. This problem can be easily overcome. For this, the following things need to be done.

News English Title: Do home remedies for constipation news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x